Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

..तर मंत्र्यांना मंत्रिमंडळातून करणार बडतर्फ; प्रमोद सावंत

ज्याच्याकडून नोकरीसाठी पैसे घेतले गेले आहेत त्याने ठोस पुराव्यासह पुढे यावे. या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी केली जाईल

दैनिक गोमन्तक

पणजी : सेक्स स्कँडलप्रकरणी भाजप (BJP) सरकारमधील एका मंत्र्यांविरुद्ध विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. मात्र, त्याचे नाव उघड करण्याचे धाडस नाही. लैंगिक अत्याचाप्रकरणी मंत्र्यांविरुद्ध तक्रार दाखल झाल्यास त्याची चौकशी करून त्यात तथ्य असल्यास त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून (Cabinet) बडतर्फ केले जाईल. असे ठोस उत्तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिले.

काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काही दिवसांपूर्वी भाजप सरकारमधील एक मंत्री सेक्स स्कँडलमध्ये गुंतल्याचा आरोप केला होता. मात्र, त्याचे नाव उघड केले नाही. सरकारला या मंत्र्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत जर कारवाई झाली नाही तर त्याचाही पर्दाफाश केला जाईल, असे चोडणकर यांनी आज स्पष्ट केले आहे.

दरम्यान, वास्कोचे भाजप आमदार कार्लोस आल्मेदा यांनी चोडणकर यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याने मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. या प्रकरणामुळे गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकतही काही मंत्र्यांनी पक्षाची बदनामी होत असल्याने त्याची दखल घेऊन पक्षाने शहानिशा करावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती.

यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, ज्या महिलेवर लैंगिक अत्याचार झाला ती तक्रार देण्यास पुढे आली किंवा ठोस पुराव्यानिशी कोणी तक्रार दाखल केल्यास त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढण्यास डगमगणार नाही. त्याची सखोल चौकशी केली जाईल. मात्र जे विरोधकांकडून आरोप केले जात आहे ते राजकीयप्रेरित आहेत. निवडणुका जवळ येत आहेत त्यामुळे सरकारविरोधात अशा प्रकारचे आरोप हे अपेक्षितच आहेत. नोकरभरती घोटळ्याचा आरोप केला जात आहे तर ज्याच्याकडून नोकरीसाठी पैसे घेतले गेले आहेत त्याने ठोस पुराव्यासह पुढे यावे. या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT