Goa: 'आत्मनिर्भर भारत आणि 'स्वंयपूर्ण गोवा राज्याच्या दिशेने सरकार पावले टाकीत आहे' CM. Pramod Sawant यांचे वक्तव्य

(Goa) आता नवीन आरोग्य केंद्रामुळे या सर्व समस्यांचे निवारण होणार असून झुआरीनगर तसेच उपासनगरातील नागरिकांनाही या केंद्राचा लाभ होणार आहे.
Goa: कासावली येथील आरोग्य केंद्राचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. बाजूस आमदार एलिना साल्ढाणा, आरोग्यमंत्री विश्वजित राणे व इतर
Goa: कासावली येथील आरोग्य केंद्राचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. बाजूस आमदार एलिना साल्ढाणा, आरोग्यमंत्री विश्वजित राणे व इतरDainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: राज्य सरकार गोव्यात शंभर वर्षांचा काळ नजरेसमोर ठेवून मोठमोठे प्रकल्प (Project) राबवीत आहे. बरेच युवक रोजगारासाठी (Employment) देशाबाहेर व राज्याबाहेर जातात. त्यांना इथेच संधी मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आत्मनिर्भर भारत आणि 'स्वंयपूर्ण गोवा (Goa) राज्याच्या दिशेने सरकार पावले टाकीत आहे. जनतेने सरकारला योग्य सहकार्य करायला हवे, तसेच सरकारला लोकांची चिंता असल्यानेच सरकार विविध सुविधा उपलब्ध करीत असून कोविड काळातही सरकारने कोणताही भेदभाव न करता लोकांना विविध प्रकारे मदत केलेली आहे. कोविड काळात कोणत्याही राज्याने दिलेले नाहीत, असे उपचार गोवा सरकारने मोफत उपलब्ध केले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM. Pramod Sawant) यांनी केले.

Goa: कासावली येथील आरोग्य केंद्राचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. बाजूस आमदार एलिना साल्ढाणा, आरोग्यमंत्री विश्वजित राणे व इतर
Goa: 2 ऑक्टोबरपासून गोवेकरांसाठी टेलिमेडिसिन सेवा सुरू

16 कोटी 3 लाख रुपये खर्च करून कासावली येथे उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र इस्पितळ इमारतीचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्याबरोबर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, जीएसआयडीसीचे (GSID) उपाध्यक्ष तथा म्हापसाचे आमदार जोशुआ डी'सोझा, कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना, कासावलीचे सरपंच फरवीन साल्ढाना, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जोश डीसा व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना की, खि. माथानी साल्ढाणा यांचे स्वप्न या हॉस्पिटलच्या उद्घाटनाने साकार झाल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

CM. Pramod Sawant
CM. Pramod SawantDainik Gomantak

हे हॉस्पिटल पूर्णत्वास येण्यामागे आमदार एलिना साल्ढाणा यांचेही योगदान असून त्यांनी समर्पीत भावनेने या हॉस्पिटलसाठी झोकून दिले होते असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री सावंत यांनी उद्घाटन करण्यात आलेल्या कासावली प्राथमिक आरोग्य केंद्रातून येथील ग्रामस्थांना आरोग्याच्या दृष्टीने उत्तम सुविधा मिळणार असल्याची माहिती दिली. कासावली व जवळच्या जनतेला उत्तम आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी येथे उत्तम प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यातयावे असे कुठ्ठाळीचे माजी आमदार स्व: माथानी साल्ढाना यांचे स्वप्न होते. जनतेच्या हितासाठी असलेले माथानी यांचे स्वप्न कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना यांनी पूर्ण केलेले असून यासाठी गोवा सरकारचा त्यांना पूर्ण पाठिंबा लाभला. मागील काळात गोवा सरकारने आरोग्य, शिक्षण आणि इतरक्षेत्रात आणखीन चांगल्या साधनसुविधा वाढवण्यात यश मिळवलेले असून भविष्यातही गोव्याच्या हीतासाठी अन्य विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. कोविड महामारीमुळे आर्थिक संकट येऊन सुद्धा गोवा सरकारने मागील काळात नागरिकांच्या हीतासाठी बरीच पावले उचललेली आहेत.

आरोग्मंत्री विश्वजत राणे यांनी यावेळी बोलताना राज्य सरकार आता गावागावातही चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करीत आहे. जनतेला चांगल्या सुविधा पुरवण्यास सरकार कटीबध्द आहे. मुख्यमंत्र्यांचे पूर्ण सहकार्य मिळतआहे. कोविड काळात आपल्या जनतेला चांगली सेवा देण्यास अमेरिका कमी पडली. मात्र, भारतात जनतेला चांगली सेवा मिळाली. असे स्पष्ट करून ऑक्टोबरमध्ये गोव्यात कॅन्सर हॉस्पिटलसाठी पायाभरणी करणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. मनोहर पर्रीकर यांनी या हॉस्पिटलची पायाभरणी केली होती. असे सांगून त्यांनी मनोहर पर्रीकरांची आठवण काढली. ३० नोव्हेंबरपर्यंत दक्षिण गोव्यात उत्तम 'कारडीयेक फेसेलीटी' सुविधेचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहीती विश्वजीत यांनी शेवटी दिली. कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना यांनी स्व: माथानी साल्ढाना यांचे आणखीन एक स्वप्न पूर्ण झाल्याने आनंद व्यक्त केला. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी स्वः मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे तसेच अनेकांचा पाठींबा मिळालेला असल्याचे साल्ढाना यांनी सांगून त्यांनी याप्रसंगी सर्वांचे आभार व्यक्त केले.आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसा यांनी कासावलीच्या हॉस्पिटल प्रकल्पाबाबत माहिती दिली.

Goa: कासावली येथील आरोग्य केंद्राचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. बाजूस आमदार एलिना साल्ढाणा, आरोग्यमंत्री विश्वजित राणे व इतर
गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी गिरीश चोडणकर कायम

मुरगाव तालुक्यातील कासावली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या आरोग्य केंद्राच्या कामाचा शिलान्यास सात वर्षांपूर्वी करण्यात आला होता. जीर्ण झालेली आरोग्य केंद्राची जुनी इमारत पाडून या जागी नवीन साधनसुविधांनीयुक्त प्रशस्त इमारत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. सुरूवातीला या कामाला वेगाने सुरूवात करण्यात आली. मात्र मध्यंतरी हे काम बरीच वर्षे रखडले. दरम्यानच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जवळच छोट्याशा जागेत प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत केले होते. त्यामुळे अनेक रुग्णांची समस्या सुटली. स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले होते.

CM. Pramod Sawant
CM. Pramod SawantDainik Gomantk

अत्याधुनिक सुविधा पुरविणार

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीत अत्याधुनिक सोयीसुविधा असणार आहेत. एकूण 36 खाटांची क्षमता असलेल्या या केंद्रात 7 ओपीडी, आई व मुलांसाठी प्रसुती वॉर्ड त्याचबरोबर महिला व पुरूषांसाठी वेगळे वॉर्ड, आयसीयू, क्ष-किरण, अल्ट्रासाऊंड कक्ष, प्रयोगशाळा, फार्मसी, बालरोग वॉर्ड अशा सुविधा या केंद्रात कार्यान्वीत असतील. या नवीन आरोग्य केंद्राचा लाभ कासावलीबरोबरच येथील वेलसांव, पाले, इसोरर्सी तसेच जवळपास असलेल्या इतर गावांतील लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या प्राथमिक केंद्रात विविध प्रकारच्या आजारांवर उपचार एकाच ठिकाणी होणार असल्याने येथील लोकांसाठी हे आरोग्य केंद्र वरदान ठरणार आहे.पूर्वीचे लहानशा जागेतील आरोग्य केंद्र रूग्णांना अडगळीचे होत होते. अनेक समस्यांना तोड द्यावे लागत होते. रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यास चिखलीतील उपजिल्हा इस्पितळात धाव घ्यावी लागत होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com