Pariksha Pe Charcha  Dainik Gomantak
गोवा

Pariksha Pe Charcha 2023: परीक्षेला उत्सव समजून सामाेरे जा! मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थांना सल्ला

पालकांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवावा व त्यांना प्रोत्साहीत करावे

गोमन्तक डिजिटल टीम

Pariksha Pe Charcha 2023: कोणत्याही विद्यार्थ्यांने कुठल्याही परिक्षेला घाबरायचे कारण नाही. मुलांनी परीक्षा हा एखादा उत्सव म्हणून सामोरे जाऊन उत्तुंग यश संपादन करावे. हा उत्सव विद्यार्थ्यांनी व त्याच्या पालकांनी पण तो साजरा करावा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी सांगितले.

परिक्षा पे चर्चा कार्यक्रमा अंतर्गत घेतलेल्या चित्रकला स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, परिक्षा म्हटले की विद्यार्थी घाबरतात. पण तसे होता नये. सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की विद्यार्थ्यांपेक्षा पालक परिक्षेचा जास्त ताण घेतात. पालकांनी सुद्धा तसे न करता विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवावा व त्यांना प्रोत्साहीत करावे.

आमच्या लहानपणात आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी कोणीच नव्हते. आताचे विद्यार्थी भाग्यवान आहेत. स्वता पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. आमच्या लहानपणात आम्हाला आमदार किंवा सरपंच सुद्धा कोण हे माहित नव्हते असेही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

प्रथमच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी 27 रोजी थेट संवाद साधणार आहेत. त्यासाठी गोव्यातील दोन विद्यार्थी व एका शिक्षकाची निवड केल्याचे त्यांनी जाहीर केले. पंतप्रधान परिक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा आत्मविश्र्वास वाढविणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गोव्यातील सर्व शाळांमध्ये करण्याची व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT