CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: विद्यार्थ्यांनो देशासाठी जगा! मुख्यमंत्री सावंताकडून हाक; डिचोलीत ‘वंदे मातरम्’ उत्साहात

Importance Of Students In Nation Building: स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाला ‘युवा भारत’ बनविण्याची जबाबदारी आजच्या विद्यार्थ्यांची आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी बलिदान देण्याची वेळ होती. मात्र, आता देशासाठी जगण्याची वेळ आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाला ‘युवा भारत’ बनविण्याची जबाबदारी आजच्या विद्यार्थ्यांची आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

डिचोलीच्या (Bicholim) अवरलेडी ऑफ ग्रेस हायस्कुलात आयोजित ‘वंदे मातरम्’ कार्यक्रमात सहभागी होताना मुख्यमंत्र्यांनी जोशपूर्ण भाषणाने विद्यार्थ्यांना संबोधित केले. देशाचे प्रेरणा गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताला २४ जानेवारी १९५० या दिवशी राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता मिळाली आहे. ७५ वर्षपूर्तीनिमित्त आज (शुक्रवारी) सर्व शाळांनी एकाचवेळी ‘वंदे मातरम्’चा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह सुभाष शिरोडकर आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचे अवरलेडी शाळेत आगमन होताच शाळेतर्फे त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यांच्याच उपस्थितीत शाळेच्या आवारात गानवृंदासह विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात ‘वंदे मातरम्’ गीत सादर केले. यावेळी डिचोलीच्या तालुका भाग शिक्षणाधिकारी लीना कळंगुटकर, अवर लेडी चर्चचे फादर सुकूर रिबेलो यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका मास्कारेन्हस तसेच शिक्षक उपस्थित होते. यावेळी ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या

‘तंदुरुस्त’ राहा!

‘वंदे मातरम्’ हे स्फूर्ती देणारे, प्रेरणादायी तसेच देशाबद्दल राष्ट्रभावना आणि अभिमान जागृत करणारे गीत आहे. देशाला महासत्ता बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी (Students) सदैव ‘तंदुरुस्त’ राहून विविध क्षेत्रात कौशल्य विकसित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT