Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: तरुणांसाठी सुवर्णसंधी! सरकारी नोकरभरतीसंदर्भात CM सावंतांची घोषणा

Manish Jadhav

Goa Government Jobs Recruitment CM Pramod Sawant

पणजी : राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या वर्षात सरकारी खात्यांतील तब्बल 2500 रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येतील. याशिवाय, 'खाजन विकास आणि संवर्धन मंडळ' स्थापन करुन खाजन जमिनींच्या संवर्धन करण्यात येईल अशी माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, स्वातंत्र्यदिनानिमित्त (15 ऑगस्ट) राजधानी पणजी येथील सचिवालयासमोर आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री बाबूश मोन्सेरात आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, गोव्याचा (Goa) विकास झपाट्याने होत आहे. 2047 पर्यंत पीएम मोदी यांनी देशाला विकसित करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यामुळे विकसित गोवा आणि विकसित भारतासाठी गोमंतकीयांनी पूर्ण योगदान दिले पाहिजे.

सावंत पुढे म्हणाले की, सध्या राज्यातील शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल होतायेत. राज्यातील तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतोय. सरकार (Government) विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनवण्याच्या निर्धाराने काम करतेय. त्यासाठी येत्या काळात राज्यातील आयटीआय अपग्रेड करण्यात येतील. तिथे आधुनिक तंत्रज्ञानाची उभारणी करण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT