CM Pramod Sawant: ऑक्टोबरपासून पशुचिकित्सा महाविद्यालय सुरू करण्याचा मानस; मुख्यमंत्री सावंत

Department Of Animal Husbandry: पशुचिकित्सा महाविद्यालय सुरू करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू झाल्या असून मुख्यमंत्र्यांनी कुर्टी येथील पशुसंवर्धन खात्याच्या इमारतीची पाहणी केली
Department Of Animal Husbandry: पशुचिकित्सा महाविद्यालय सुरू करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू झाल्या असून मुख्यमंत्र्यांनी कुर्टी येथील पशुसंवर्धन खात्याच्या इमारतीची पाहणी केली
Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: येथे पशुचिकित्सा महाविद्यालय सुरू करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू झाल्या असून खुद्द मुख्यमंत्र्यांनी आज (मंगळवारी) कुर्टी येथील पशुसंवर्धन खात्याच्या इमारतीची पाहणी केली. केंद्रीय पशुचिकित्सा मंडळाने मान्यता दिल्यानंतर शक्यतो येत्या ऑक्टोबरपासून हे पशुचिकित्सा महाविद्यालय सुरू करण्याचा सरकारचा मानस असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पत्रकारांना सांगितले.

कुर्टी-फोंड्यात पशुसंवर्धन खात्याच्या इमारत प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सरकारी अधिकाऱ्यांसमवेत केली.

या खात्याच्या विविध विभागांचीही तपासणी करताना कर्मचाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. या इमारतीतील वर्गासाठी खोल्या, बाकडे तसेच इतर साहित्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकार बांधील असून राज्यातील पहिलेवहिले पशुचिकित्सा महाविद्यालय सुरू करण्यासाठी सरकार आग्रही आहे.

यावेळी पशुचिकित्सा उपसंचालक शिरीषकुमार बेतकीकर, पशुचिकित्सा मंडळाचे हर्ष बथनी तसेच निमंत्रक गोविंद सावंत, पशुसंवर्धन खात्याचे इतर अधिकारी, गोवा डेअरीचे डॉ. रामा परब, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आदी उपस्थित होते.

कुर्टीतील पशुसंवर्धन खात्याच्या इमारत प्रकल्पात या महाविद्यालयासाठी पुरेशी जागा असून एकदा महाविद्यालय सुरू केल्यानंतर पुढील काळात नवीन इमारत उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोवा विद्यापीठाकडून या महाविद्यालयासाठी हिरवा कंदील दर्शविण्यात आला असून या जागेची गोवा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनीही पाहणी केली. आता फक्त केंद्रीय पशुचिकित्सा मंडळाची परवानगी मिळण्याची आवश्‍यकता असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Department Of Animal Husbandry: पशुचिकित्सा महाविद्यालय सुरू करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू झाल्या असून मुख्यमंत्र्यांनी कुर्टी येथील पशुसंवर्धन खात्याच्या इमारतीची पाहणी केली
CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांची गोवा डेअरीला आकस्मिक भेट; अधिकाऱ्यांची मात्र धावपळ

असे असेल पशुचिकित्सा महाविद्यालय?

कुर्टी नियोजित पशुचिकित्सा महाविद्यालय हे राज्यातील पहिले महाविद्यालय ठरणार आहे. गोवा कॉलेज व्हेटर्नरी सायन्सेस या नावाने हे महाविद्यालय सुरू करण्यात येईल. या महाविद्यालयात एकूण ६० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. त्यात गोव्यासह बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात येईल. मात्र गोमंतकीय विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य असेल. दरवर्षी गोव्यातील आठ विद्यार्थी बाहेरील राज्यातील महाविद्यालयात शिकतात, ती सुविधा आता गोव्यात उपलब्ध होईल. महाविद्यालय सुरू झाल्यानंतर कुर्टीतच नवीन संकुल उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com