IIT Movement

 

Dainik gomantak

गोवा

‘आयआयटी’ विरोधकांची दुचाकी रॅली, सरकारविरोधात आंदोलन पुन्हा आक्रमक

मागण्या मान्य न झाल्यास पुन्‍हा रॅली, आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला

दैनिक गोमन्तक

गुळेली : वाळपई मतदारसंघात मेळावलीवासीयांनी आयआयटीविरोधात काल सकाळी दुचाकी रॅली काढली. गुळेलीहून सुरू केलेली रॅली उसगाव पंचायत क्षेत्रात नेण्यासाठी म्हणून गुळेलीमार्गे गांजे येथे पोचले असता त्या ठिकाणी पोलिसांनी ही रॅली रोखली.

गांजे या ठिकाणी बंधाऱ्याचे उद्‍घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या हस्ते होणार होते, त्यावेळी या रॅलीला गांजेच्या पुढे उसगावच्या बाजूने जायला दिले नाही. रॅलीचा परवाना नसल्याचे कारण पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना दिले, ते मान्य करत आंदोलनकर्त्या नागरिकांनी परत गुळेलीमार्गे खोतोडा पंचायत व त्यानंतर नगरगाव, सावर्डे आदी पंचायत क्षेत्रात रॅली काढली.

‘आयआयटी’च्या (IIT) विरोधातील आंदोलकावरील गुन्हे मागे न घेतल्यामुळे, ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या 19 डिसेंबरपासून गुळेली पंचायत कार्यालयात आंदोलन (Movement) करणाऱ्या ग्रामस्थांनी 27 डिसेंबर रोजी संध्याकाळी पंचायत कार्यालय बंद करण्यास हरकत घेतल्यानंतर काही अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तात्पुरते आंदोलन मागे घेतले. मंगळवारी निषेध रॅलीचे आयोजन केले होते. या लोकांना समजवण्यासाठी सत्तरीचे उपजिल्हाधिकारी प्रविण परब, गटविकास अधिकारी सुर्याजिराव राणे, पंचायत सचिव गावकर, वाळपई पोलिस निरीक्षक हरीश गावस आदी उपस्थित होते.

रॅली संपल्यानतर सातेरी जल्मी देवस्थानात चर्चा करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास पुन्‍हा रॅली, आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. शुभम शिवोलकर, शशिकांत सावर्डेकर, शंकर नाईक, विश्वेश परोब उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT