Goa Chicken prices Dainik Gomantak
गोवा

Goa: गावठी चिकन झाले गरम, डिचोलीत किलोमागे 20 रुपयांनी वाढ

गोव्यात (Goa) बॉयलर कोंबड्यांचा तुटवडा, आणखी महागणार?

दैनिक गोमन्तक

डिचोली: मासळीसाठी (Goa Fish) मारामारी झाली असतानाच, आता बॉयलर (Boiler Chicken) चिकनही महाग झाले आहे. मासळी पाठोपाठ बॉयलर चिकनच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या डिचोलीत (Bicholim) चिकनच्या किलोमागे 20 रुपयांनी वाढ झाली असून, पुढील काही दिवसात त्यात आणखी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. (Chicken prices will go up in Goa due to shortage of boiler hens)

त्यामुळे चिकनप्रेमी खवय्यांना आता आपल्या जिभेला लगाम घालावा लागणार आहे. मागील आठवड्यात 140 रुपये किलो दराने विकण्यात येणाऱ्या बॉयलर कोंबड्या आता 160 रुपये किलो याप्रमाणे विकण्यात येत आहेत. स्थानिक कुकूटपालन फार्ममध्ये बॉयलर कोंबड्याचा तुटवडा असून, राज्याबाहेरूनही बॉयलर कोंबड्यांची आवक घटली आहे. असे डिचोली शहरातील चिकन विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

किलोमागे 20 रुपयांनी वाढ

खोल समुद्रातील मासेमारीमुळे मागील जून महिन्यापासून समुद्रातील ताजी मासळी मिळणे मुश्किल झाले आहे. त्यातच बाजारात मिळणारी गावठी आणि अन्य मासळी महाग झाल्याने आणि पावसाळाही सुरु झाल्याने मागील महिन्यापासून बॉयलर चिकनला चांगले दिवस आले आहेत. मागील आठवड्यापर्यंत डिचोलीत 140 रुपये किलो याप्रमाणे बॉयलर चिकनची विक्री करण्यात येत होती. मागील रविवारी चिकन दरात अचानक वाढ होताना हा दर 155 रुपये असा झाला. तर आज (गुरुवारी) हाच दर 160 रुपयांपर्यंत पोचला आहे. तर सुटे चिकन 260 रुपये किलो या दराने विकण्यात येत आहे.

दरदिवशी चिकनला मागणी

चिकन खवय्ये ग्राहकांसह फास्ट फूडसह रेस्टॉरंट आणि मद्यालयांनी मिळून डिचोलीत बॉयलर चिकनला नियमित मागणी असते. शहरात सहा चिकन सेंटर आहेत. आठवड्यातील एक-दोन दिवस वगळता अन्य दिवशी सरासरी 1 हजार ते बाराशे किलो चिकनची विक्री होत असते. बुधवारी आणि रविवारी तर चिकनची दुप्पट विक्री होत असते. अशी माहिती शहरातील चिकन विक्रेत्यांकडून मिळाली आहे.

गावठी चिकन आवाक्याबाहेर

बॉयलर चिकनच्या तुलनेत गावठी चिकन खवय्यांच्या आवाक्याबाहेर आहे. सध्या गावठी कोंबडा 600 ते 700 रुपये दराने विकण्यात येत आहे. शहरातील एक-दोन चिकन सेंटरमध्ये हे गावठी कोंबडे विक्रीस उपलब्ध असतात. या दिवसांनी श्रावण मासाला प्रारंभ होण्यापूर्वी बहूतेक ग्रामीण भागात "वाडवळ" वाढण्याची परंपरा आहे. त्यासाठी गावठी कोंबडाच हवा असतो. त्यामुळे आवाक्याबाहेर असले, तरी सध्या गावठी कोंबड्यांना मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

SCROLL FOR NEXT