Goa Chicken prices Dainik Gomantak
गोवा

Goa Chicken Prices: राज्यात चिकन झाले महाग..

राज्यातील चिकन किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यात चिकन महाग झाले असून त्याची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून जिवंत चिकन आणि ब्रॉयलरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

व्यावसायिक राजधानीतील काही प्रमुख आउटलेटवर जिवंत चिकनची किंमत सुमारे 175 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. सोमवारी बाजारात एक किलो ब्रॉयलरचा भाव 214 रुपयांच्या जवळपास होता. जिवंत आणि ब्रॉयलर अशा दोन्ही प्रकारच्या चिकनच्या वाढत्या किमतीचे श्रेय राष्ट्रीय बाजारपेठेतील समान दराला व्यापाऱ्यांनी दिले. (Chicken became expensive in Goa state)

काही व्यापाऱ्यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे की खाद्याच्या वाढत्या किमती आणि कमी उत्पादन या सर्व गोष्टी गेल्या काही दिवसांपासून चिकनच्या (Chicken) किमती गगनाला भिडल्या आहेत. “अलिकडच्या काही महिन्यांतील ही कदाचित पहिलीच वेळ आहे की जिवंत कोंबडी चिकनची किंमत 175 रुपये प्रति किलोग्रॅमवर ​​पोहोचली आहे”, अशी माहिती एका व्यापाऱ्याने दिली. देशभरात चिकनचे दर जवळपास सारखेच असल्याचे सांगत येत्या काही दिवसांत कोंबडीचे भाव खाली येण्याची शक्यता व्यवसायातील सूत्रांनी फेटाळून लावली आहे.चिकनच्या चढ्या किमती पाहता, काही व्यापाऱ्यांनी कमी दराने त्याची विक्री सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT