Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj Dainik Gomantak
गोवा

विद्यानगर-सांकवाळ येथे सोमवारी तिथीनुसार छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती

दैनिक गोमन्तक

वास्को: देशासाठी शिवकार्य, आणि शिवकार्यातून राष्ट्र बांधणी केली पाहिजे, या उदात्त हेतूने विद्यानगर परिसरातील शिवप्रेमी, शिवभक्त एकत्र येऊन या महान युगपुरुषाची जयंती तिथीनुसार सोमवार दि. 21 मार्च रोजी सांय. 5 वा. साजरी करण्यात येणार आहेत. या सोहळ्याला दाबोळीचे आमदार तथा माजी मंत्री माविन गुदिन्हो, प्रियोळचे आमदार तथा माजी मंत्री नाट्य प्रेमी गोविंद गावडे, वास्कोचे आमदार कृष्णा ( दाजी ) साळकर, सरपंच गिरीश पिल्ले, जि.पं. अध्यक्ष अनिता थोरात आणि महिला व बाल कल्याण खात्याच्या संचालक दीपाली नाईक उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने यशस्वी हॉटेल उद्योजक आणि छत्रपतींच्या इतिहासावर प्रेम करणारे रवी हसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

काकोड्यात सोमवारी तिथीनुसार शिवजयंती

छ्त्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती निमित्त सोमवार ता. 21 मार्च रोजी काकोडा येथील महादेव देवस्थान, जय भवानी सांस्कृतिक मंडळ आणि राष्ट्रीय जागृती दल यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती पुष्कल सावंत यांनी दिली. सोमवारी सकाळी काकोडा येथील श्री महादेव मंदिराच्या प्रांगणात सकाळी 9 वाजता अभिषेक होणार आहे.

संध्याकाळी 4 वाजता शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याची व शिवप्रतिमा पालखीत विराजमान करून ढोल ताशांच्या गजरात श्री महादेव देवस्थान काकोडा येथून भव्य मिरवणुकीला प्रारंभ करण्यात येणार आहे. तेथून बाणसाय मार्गे कुडचडे बस स्थानकाला वळसा घालून पोलिस स्टेशन मार्गे शिवाजी चौकपर्यंत येऊन शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात येणार आहे. त्या नंतर भवानी मातेला नमन करून विविध कार्यक्रम होतील. या शिवजयंती उत्सवात शिवप्रेमी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पुष्कल सावंत यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: राज्यात दोन ठिकाणी आगीच्या घटनेत मोठे नुकसान हानी; जीवितहानी टळली

Loksabha Election 2024: काँग्रेस उमेदवार विरियातो यांच्या समर्थक महिलेने पैसे वाटल्याची तक्रार

Goa River: राज्यातील सहा नदीपट्टे प्रदूषित; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जलस्रोतांची पाहणी

Santa Cruz Panchayat: सांताक्रुझ पंचायत सत्ता सारीपाटावर; ‘विरोधी’ सोंगट्यांना कोटींचे लालूच?

Calangute ODP: कळंगुट ओडीपी खटला लांबणीवर; सुनावणीसाठी तयार नसल्याने सरकारवर ओढावली नामुष्की

SCROLL FOR NEXT