Mardangad Fort History  Dainik Gomantak
गोवा

Mardan Gad Goa: 200 मराठा सैनिकांचा पराक्रम, 27 दिवस गड तोडण्याचा प्रयत्न; पोर्तुगीजांचे 'मर्दन' करणाऱ्या गोव्यातील 'अज्ञात' गडाची गोष्ट..

Maratha Fort In Goa: संभाजीराजे म्हटलं की आपल्याला फर्मागुढीचा किल्ला आठवतो खरा, पण आजची ही गोष्ट त्याहीपेक्षा वेगळी आहे, कदाचित आपण ती विसरून गेलोय.

Akshata Chhatre

फोंडा: गोव्याचा इतिहास समृद्ध आहे, अनेक राजवंशांनी गोव्यावर शतकानुशतके राज्य केलं. या राज्याला लाभलेल्या सुंदर किनारपट्टी आणि सागरी व्यापाराच्या संधींमुळे अनेक राजे-महाराजे गोव्याकडे वळले, यांपैकीच एक म्हणजे पोर्तुगीजांची सत्ता. या परकीय सत्तेला सळो-की-पळो करणाऱ्या मराठी सत्तेच्या पाऊलखुणा गोव्याच्या इतिहासात पाहायला मिळतात. यांपैकीच एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या फोंड्यातील गडाची गोष्ट. संभाजीराजे म्हटलं की आपल्याला फर्मागुढीचा किल्ला आठवतो खरा, पण आजची ही गोष्ट त्याहीपेक्षा वेगळी आहे. कदाचित आपणच ती विसरून गेलोय.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पोर्तुगीजांवर आक्रमण

फोंड्यात महाराजांचा आणखीन एक किल्ला होता, मर्दनगड. दुर्दैवाने आज मर्दनगडाचे फक्त काही अवशेष पाहायला मिळतात. १५१० मध्ये पोर्तुगीज गोव्यात आले मात्र तेव्हा गोव्यात आदिलशाही राज्य होतं आणि फोंडा हा भाग आदिलशाहीच्या राजवटीत येणारा होता.

आपल्या माहितीप्रमाणे फोंड्यात फक्त एक किल्ला आहे पण ते सत्य नाही. १६व्या शतकात आदीलशाही राजवटीत बेतूल येथे एक किल्ला बांधण्यात आला होता, पोर्तुगीज आणि मराठ्यांपासून संरक्षण मिळावं म्हणून. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला काबीज केला आणि तिथे मराठ्यांचा झेंडा फडकला.

छत्रपती संभाजी महाराज यांची गोवा स्वारी

१६८० मध्ये छत्रपतींच्या निधनानंतर गोव्यात पोर्तुगीजांनी हा किल्ला मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला खरा, मात्र ते यशस्वी झाले नाहीत. छत्रपती संभाजी महाराज हे त्यांचे वडील शिवाजी महाराजांप्रमाणेच उत्तम प्रशासक होते. वर्ष १६८३ मध्ये पोर्तुगीजांनी फोंडा किल्ल्याचा ताबा घेण्यासाठी नाईक नावाच्या मराठा किल्लेदाराला लाच दिली आणि पोर्तुगीज गव्हर्नर जनरल कोंडे डी अल्व्होरने हल्ला करून किल्ल्याचा ताबा मिळवला.

महाराष्ट्रात येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक या सेनापतीसह राजापूर येथे मुक्काम केलेल्या संभाजी महाराजांना ही बातमी समजताच ताबडतोब ते आपल्या सैन्यासह गोव्यातील डिचोलीकडे रवाना झाले. कौटुंबिक कलहामुळे महाराजांशी हातमिळवणी करणाऱ्या औरंगजेबाचा मुलगा मोहम्मद अकबर (मुअज्जम) याच्याकडे त्यांनी ९०० सैनिक मागितले. पोर्तुगीज गव्हर्नर जनरल कोंडे डी अल्व्होर मराठा सैन्य पोर्तुगीजांवर तुटून पडत असल्याचे पाहून युद्धातून निसटला. फोंडा किल्ल्याच्या युद्धात पोर्तुगिजांचा मोठ्या प्रमाणात नाश झाला.

पोर्तुगीजांच्या हल्ल्यानंतर, ६ डिसेंबर १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी मराठ्यांसाठी टेहळणी बुरूज म्हणून फोंड्याच्या उंच डोंगरावर मर्दनगड हा नवीन किल्ला बांधण्याचा आदेश दिला. मर्दनगड बांधण्यासाठी फोंडा किल्ल्यावरून दगड वाहून नेण्यात आले. उंच शिखरावर असलेल्या या गडावर ज्याचे राज्य तोच संपूर्ण गोव्यावर राज्य करू शकेल अशी या गडाची ख्याती होती. पोर्तुगीजांचे मर्दन करणारा मर्दनगड अशी याची ख्याती गोवा मुक्ती संग्राम या पुस्तकात वाचायला मिळते.

मर्दनगडाची लढाई

छत्रपती संभाजी महाराज यांच्या निधनानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी किल्ल्याचा ताबा सौंदाच्या राजाजवळ सोपवला. १७ जून १७५५ रोजी पोर्तुगीजांनी मर्दनगडावर हल्ला केला. गव्हर्नर जनरल कोंडे डी अल्वा याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांनी राशोल किल्ल्यावरून हा हल्ला चढवला आणि गोळीबार करण्यासाठी कपिलेश्वरी टेकडीवर तोफाही बसवल्या.त्यावेळी येसाजी हुपरीकर नावाच्या मराठा सेनापतीने मर्दनगड किल्ल्याचे नेतृत्व केले होते.

मर्दनगडची लढाई ही गोव्याच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. मराठ्यांकडून येसाजी हुपरीकर यांच्या नेतृत्वाखाली २०० मराठा सैनिकांनी पोर्तुगीज सैन्याचा धैर्याने सामना केला. पोर्तुगीजांची संख्या जास्त असूनही, मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून विजय मिळवला आणि त्यांचा गव्हर्नर जनरल कोंडा डी अल्वा यांना ठार मारले.

१४ दिवसांची अखेरची लढाई

मराठ्यांच्या सत्तेचं प्रतीक म्हणजेच मर्दनगड भुईसपाट करणं पोर्तुगिजांचं प्रमुख ध्येय होतं. गोव्यातील काही लोकं पोर्तुगीजांना फितूर झाली आणि छत्रपतींनी बांधलेला हा गड भुईसपाट झाला. १७ मे १७६३ रोजी झालेल्या १४ दिवसांच्या भयंकर लढाईनंतर मर्दनगड किल्ला पोर्तुगीजांच्या हाती सापडला. पोर्तुगीजांनी किल्ल्यातील अधिकाऱ्यांना लाच दिली, ज्यामुळे शेवटी त्यांचा विजय झाला. पोर्तुगीजांना फोंड्याच्या सरदेसाईंचे, सौंदेकर राजाचे सैन्य आणि सावंतवाडीच्या भोसले यांनी पाठवलेले सैनिक यांचेही सहकार्य लाभले.

मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा, छत्रपती संभाजी महाराजांचा हा गड पाडण्यासाठी पोर्तुगीजांना तब्बल २७ दिवस लागले होते. काही वर्षानंतर गोमंतकीयांनी परकीय सत्ता झटकून टाकली, मात्र दुर्दैवाने शौर्याचं प्रतीक असलेला मर्दनगड अजूनही त्याच अवस्थेत कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT