Chhaava: कळंगुटमध्ये "नमः पार्वती पतये हर-हर महादेव"ची गर्जना; 'छावा'च्या पराक्रमाची जादू गोवेकरांवर

Chhaava Screening in Goa: छत्रपती संभाजी राजे म्हणजेच स्वराज्याचे धाकले धनी घराघरांमध्ये पोहिचवेत म्हणून विविध संघटनांकडून तरुणांना हा चित्रपट दाखवला जातोय
Chhaava Movie
Chhaava Movie Dainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: सध्या बहुचर्चित असलेला चित्रपट म्हणजेच लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची क्रेझ गोव्यात देखील पाहायला मिळतेय. छत्रपती संभाजी राजे म्हणजेच स्वराज्याचे धाकले धनी घराघरांमध्ये पोहोचावेत म्हणून विविध संघटनांकडून तरुणांना हा चित्रपट दाखवला जातोय. रविवारी (दि. १६ फेब्रुवारी) रोजी कळंगुट येथील श्री शांतादुर्गा-बाब्रेश्वर युवक संघाकडून तरुणांसाठी छावा या चित्रपटाच पाहण्याची सोय करण्यात आली होती.

कळंगुटचे पंच सदस्य प्रसाद शिरोडकर यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमात जवळपास १५० पेक्षा अधिक प्रेक्षक उपस्थित होते. या संघटनेतील सुरज पिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणांना छत्रपती संभाजी राजे आणि त्यांचे बलिदान याबद्दल माहिती मिळावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला.

Chhaava Movie
Chhava Movie: 'छावा'ची गोव्यात क्रेझ! कुडचडेत गोमंतकीय सिनेरसिकांची चित्रपटगृहात तूफान गर्दी; समाजकल्याण मंत्र्यांनी लावली हजेरी

मुघली सत्ताधीश बादशाह औरंगझेब याने छत्रपती संभाजी महाराज यांना मरण यातना दिल्या, मात्र तरीही त्याच्यासमोर न झुकता केवळ धर्म आणि स्वराज अबाधित राहावं म्हणून महाराजांनी या यातना सहन केल्या आणि हाच भव्य इतिहास आजच्या पिढीला समजावा म्हणून त्यांच्याकडून हा उपक्रम करण्यात आला. महाराज्यांचं बलिदान मनामनामध्ये कायम राहावं म्हणून तरुणांना आणि लहानग्यांना चित्रपट दाखवण्यासाठी आणलं असं सुरज पिंगे म्हणालेत.

विकी कौशलची जादू!!

लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शित चित्रपटात धर्मवीर संभाजी महाराज यांच्या भूमिकेत विकी कौशल आहे. विकीच्या अभिनयाचे सध्या सगळीकडे कौतुक केले जातेय. हिंदी अभिनेता असून देखील विकीचा मराठीचा अभ्यास या चित्रपटात वाखण्याजोगा असल्याचं प्रेक्षक म्हणतायत. याशिवाय चित्रपटात रश्मिका आणि अक्षय खन्ना हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com