Chhaava: "पाच महिने दररोज 4-5 तास भाषेचा सराव केला" 'छावा' चित्रपटासाठी विकी-रश्मिकाने गिरवले मराठीचे धडे

Vicky Kaushal Chhaava Movie: विकी कौशल आणि रश्मिका या चित्रपटासाठी मराठी शिकले तरी कसे?
Rashmika- Vicky Chhaava
Rashmika- Vicky ChhaavaDainik Gomantak
Published on
Updated on

Chhaava Movie: केवळ मराठीच नाही तर देशातील बहुभाषिक प्रेक्षकांना ज्याची ओढ लागली होती तो छावा चित्रपट सिनेमागृहांमध्ये आलाय. विकी कौशल आणि दक्षिणेतील अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्यासोबत अक्षय खन्ना या चित्रपटाचा प्रमुख भाग आहे.

छावा हा चित्रपट जरी हिंदी भाषेत असला तरीही हा सिनेमा मराठी माणसांचा आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर आणण्याचे काम या चित्रपटाच्या माध्यमातून लक्ष्मण उतेकर यांनी केलंय आणि यासाठी मराठीची कसर बाकी राहील असा भागच नव्हता. छावा चित्रपटात मराठी भाषेचा बराच वापर केला गेलाय. मग विकी कौशल आणि रश्मिका या चित्रपटासाठी मराठी शिकले तरी कसे? चला जाणून घेऊया...

विकी कौशल हा नेहमीच त्याला मिळालेल्या भूमिका चोख बजावण्याचा प्रयत्न करत असतो. छावा या चित्रपटासाठी देखील विकीने बरीच मेहनत घेतली आहे. छावा हा संभाजी महाराजांचा चित्रपट असल्याने या चित्रपटाला मराठी भाषेचा टच येणं महत्वाचं होतं.

Rashmika- Vicky Chhaava
Chhaava Movie Review: छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा 'छावा' चित्रपट कसाय? वाचा प्रेक्षकांचा रिव्ह्यू

विकी आणि रश्मीकने त्यांच्या पात्रांना योग्य तो न्याय देण्यासाठी मराठी भाषेचा सराव केला आणि भाषेचे प्रशिक्षण घेतले. पडद्यावर छावा चित्रपटात कोणतीही कमतरता राहू नये म्हणून निर्मात्यांना कोणतीही उणीव बाकी ठेवायची नव्हती.

छावाच्या निमित्ताने मराठीच्या प्रशिक्षणाबद्दल बोलताना रश्मिका सांगते की या चित्रपटासाठी तिने दररोज ४-५ तास भाषेचा सराव करण्यात घालवले आहेत. चित्रपटसृष्टीत काम करताना एखादी ऐतिहासिक भूमिका मिळावी अशी तिची नेहमीच इच्छा होती आणि या चित्रपटामुळे ती पूर्ण झाली. विकी प्रमाणे रश्मिका काही हिंदी भाषिक नाही त्यामुळे हिंदीचा सर्व सुद्धा तिच्यासाठी कठीणच होता. चित्रपटात संवाद चांगले व्हावेत म्हणून पाच महिने सलग मेहनत घेतल्याचं रश्मिका सांगते. या चित्रपटातील व्यक्तिरेखेची भाषा बोलण्याचा नाही तर तिचं जीवन जगण्याचा अनुभव घेतला, भाषा ही फक्त बोलण्यापुरती मर्यादित नाही तर त्यात भावना देखील आहेत असं रश्मिका म्हणाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com