Madgaon Railway Station Dainik Gomantak
गोवा

स्टेशन उभारणीला कोकण रेल्वे महामंडळाकडून प्राधान्य

पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने इलेक्ट्रिक वाहन घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढत चालला आहे. आणि सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढते आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मडगाव येथील कोकण रेल्वे स्टेशनच्या गाड्या पार्किंग करण्यात येत असलेल्या जागेवर विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन स्थापन करण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाकडून निविदा मागविण्यात येणार असल्याची कोकण रेल्वेचे जनसपंर्क अधिकारी बबन घाटगे यांनी सांगितले.

(charging station will be set up in the parking space of the Margaon railway station)

पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने इलेक्ट्रिक वाहन घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढत चालला आहे. आणि सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढते आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी पायाभूत सुविधा उभारणीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यातच तर अद्यापही काहीजण हे वाहन खरेदी करताना शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन आहे का, याचाही विचार करताना दिसत आहेत.

इलेक्ट्रिक स्कूटर आणि कारचा ग्राहक मोठ्या संख्येने वाढत आहे. कोकण रेल्वे स्टेशनवर अनेक प्रवाशी येत असतात. त्यांच्या गाड्यांसाठी हे चार्जिंग स्टेशन महत्वाचे असणार आहे. पर्यावरणाच्या सुरक्षेचा विचार करूनही अनेकजण इलेक्ट्रिक वाहने घेण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे येणारा काळ हा या वाहनांचा असणार असल्याने हे स्टेशन उभारणीला कोकण रेल्वे महामंडळाकडून प्राधान्य देण्यात आले असल्याचे बबन घाटगे यांनी माहिती देताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT