काणकोणातील 59 पैकी 21 प्रभाग महिलांसाठी राखीव

काणकोणातील 59 पैकी 21 प्रभाग सर्वसाधारण, अनुसूचित जमाती व ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
Goa Panchayat Election News
Goa Panchayat Election NewsDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: काणकोणातील 59 पैकी 21 प्रभाग सर्वसाधारण, अनुसूचित जमाती व ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सात पंचायतींच्या 59 पंचांपैकी 21 पंच महिला राहणार आहेत.

(21 out of 59 wards reserved for women in Canacona)

Goa Panchayat Election News
धक्कादायक! मृत व्यक्तीच्या नावे ‘बार’ परवाना

सातपैकी दोन पंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव राहणार आहे. त्यामध्ये श्रीस्थळ, पैंगीण व लोलये पोळे पंचायतींचा समावेश राहणार आहे. त्यामुळे या पंचायतींत आपल्या गटाची सरपंच रहावी यासाठी सत्ताधारी व विरोधी नेत्यांनी समर्थक महिलांना उमेदवारी दाखल करण्यास प्रोत्साहन दिले आहे.

21 महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभागांपैकी दहा सर्वसाधारण, 4 ओबीसी व 7 एसटीसाठी राखीव आहेत. सात पंचायत क्षेत्रात एकूण २८,६५९ पैकी १४५६० महिला व १४०९९ पुरुष मतदार आहेत. लोलये - पोळेत ४५७३ मतदार असून त्यामध्ये २१२७ पुरूष व २४४६ महिला, पैंगीणमध्ये ५८४७ मतदारांपैकी २८०३ पुरुष व ३०४४ महिला, खोतीगावात २९४६ पैकी १०६७ पुरुष व १०७९ महिला, गावडोंगरीत ४५०९ पैकी २१०५ पुरुष व २००४ महिला, श्रीस्थळ ४११४ मध्ये २०९० पुरुष व २०२४ महिला, आगोंदात ४५०९ मतदार असून त्यापैकी १६१४ पुरुष व १७४३ महिला. खोला त ३३५७ पैकी २९९३ पुरुष व २२२० महिला मतदार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com