मडगाव: कोलवा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस हवालदारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी मंगळवारी क्रेग रॉड्रिग्स (31) या कार चालकावर आरोपपत्र दाखल केले. रॉड्रिग्स हा मडगाव येथील रहिवासी होता. (Chargesheet filed against Rodriguez in constable's accidental death in Goa)
या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक मेलसन कोलाको यांनी मडगाव येथील न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग (जेएमएफसी) यांच्यासमोर आरोपपत्र सादर केले आहे.
दक्षिण गोव्यातील सेरलीम येथे हा अपघात (Accident) झाला होता. नाकाबंदीच्या ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना भरधाव कारने उडवल्याची धक्कादायक घटना घडली होती. या भरधाव कारच्या घडकेत शैलेश गावकर आणि विश्वास देयकर या दोघा पोलिस (Goa Police) कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. दरम्यान कारचालकाला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
राज्यात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात जागोजागी गोवा पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला होता. आचारसंहितेचा (Social Code of Conduct) भंग होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांची (Goa Police) टीम तैनात करण्यात आली होती. याचदरम्यान कामावर रुजू असताना दोन पोलिसांसोबत अपघात झाला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.