वाळपई : सामाजिक कार्यकर्ते हनुमंत परब यांनी मंगळवारी पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते यांच्या विरोधात वाळपोई पोलीस ठाण्यात विनाकारण मारहाण आणि हिंसाचार केल्याप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल केली आहे.(Hanumant Parab lodged a complaint against DYSP and PSI for committing violence in goa)
परब यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, सत्तरी तालुक्यातील पिसुर्ले गावातील सुमारे 150 शेतकर्यांना (Farmer) त्यांना त्यांच्या शेतातील गाळ तसेच गावातील बेकायदेशीर खाणकामांमुळे उद्ध्वस्त झालेल्या जलकुंभांमुळे मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. (Goa Farmer Latest News updates)
11 मार्च रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास एका जागेवर अनुसूचित जाती- जमाती समुदायातील स्त्री-पुरुषांसह सुमारे 50 शेतकरी उपस्थित होते, तेव्हा अचानक पीआय फडते यांच्या नेतृत्वाखाली एक बस आणि दोन जीपमधून पोलिस (Goa Police) आल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्यांनी पोलिसांच्या आगमनावर प्रश्न केला असता, पीआयने उत्तर दिले की मामलेदार देखील घटनास्थळी येत आहेत.
परब पुढे म्हणाले की, “मला पोलिस ठाण्यात नेण्यात आले दरम्यान माझ्या पत्नीशी संपर्क साधण्याची परवानगी मागितल्यानंतर मी पत्नीला मुलाला शाळेतून घरी अणण्यास सांगत असताना डीवायएसपी एकोस्कर त्या ठीकाणी आले आणि त्यांनी माझा फोन घेतला. एकोसकरने अचानक माझ्या डाव्या डोळ्यावर ठोसा मारल्याने मला दुखापत झाली. नंतर डीवायएसपी आणि पीआय फडते यांनी मला लाथाबूक्क्यांनी मारहाण केली असल्याचे त्यांनी सांगीतले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.