Cyclist Rupesh Raj Thakur Dainik Gomantak
गोवा

Chardham Yatra : सायकलवरून चारधाम यात्रा; बिहारमधील युवकाचा संकल्प

Chardham Yatra : कर्नाटकमार्गे गोव्यात आल्याची माहिती त्याने दिली. बिहारमधील छापरा जिल्ह्यातील या युवकाचे नाव रुपेश राज ठाकूर असे आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Chardham Yatra : डिचोली, बिहार येथील एका युवकाने सायकलवरून चारधाम यात्रा करण्याचा संकल्प केला असून काल हा युवक डिचोली शहरात पोचला.

कर्नाटकमार्गे गोव्यात आल्याची माहिती त्याने दिली. बिहारमधील छापरा जिल्ह्यातील या युवकाचे नाव रुपेश राज ठाकूर असे आहे.

गेल्यावर्षी २८ ऑगस्ट रोजी बिहार येथून मी सायकल यात्रेला प्रारंभ केला असून साडेपाच महिन्यांहून अधिक दिवसांपासून मी सायकलवरून भ्रमंती करीत आहे, असे या युवकाने सांगितले. ‘झाडे लावा, जीवन जगा’ असा संदेश देणारा फलकही त्याने आपल्या सायकलवर लावला आहे. माझी सायकल यात्रा सुरळीत चालू आहे.

आतापर्यंत ज्या-ज्या भागात पोचलो, त्याठिकाणी मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकजण माझी आपुलकीने चौकशी करतात. प्रवासादरम्यान कोणतीच अडचण आली नसल्याचे रुपेश याने सांगितले. आता माझे लक्ष्य गुजरात असल्याचे त्याने सांगितले.

जीवनात ईश्वरभक्ती आवश्यक

चारधाम यात्रा म्हणजे मोठी भक्ती आहे. जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने ईश्वरभक्ती करावी, असा संदेश रुपेश राज ठाकूर याने दिला आहे. चारधाम यात्रा पूर्ततेसाठी आणखी किमान एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे त्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

Ravi Naik: रवींना 'मगो'चे नेतृत्व मिळाले असते तर...?

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT