Goa Fire Case: पणजीत इमारतीच्या बांधकाम साईटवर आग; सुदैवाने अनर्थ टळला

Goa Fire Case: प्लास्टिक, थर्माकोलचा कचरा जळून खाक
Fire Brigade
Fire BrigadeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Fire Case: पणजी कांपाल येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील कचऱ्याला अकस्मात लागल्याने तेथील प्लास्टिक व थर्माकोल कचरा तसेच लाकडी सामान खाक झाली.

ही आग तेथे जळती सिगारेट टाकल्याने लागली असण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना आज दुपारी 12.15 च्या सुमारास घडली.

याप्रकरणी इमारतीच्या मालकाने तक्रार दाखल केली नसल्याची माहिती पणजी अग्निशमन दलाचे अधिकारी एस. व्ही. नाईक यांनी दिली.

अग्निशन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या ठिकाणी काही कामगार काम करत होते. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर प्लास्टिक व थर्मोकोलचा कचरा टाकण्यात आला होता.

या ठिकाणी काम झाल्यानंतर काही कामगार खाली उतरले होते. त्यानंतर काही वेळाने कचऱ्यातून धूर येऊ लागला व अचानक आगीने पेट घेतला. या घटनेची माहिती जवळच असलेल्या अग्निमशन दल नियंत्रण कक्षाला देण्यात आली.

Fire Brigade
Goa Road Accident: दुर्दैवी ! 48 तासांत 5 जण मृत्युमुखी! सावंत सरकार अजून किती जणांचे बळी घेणार?- पाटकर

पाण्याचा बंब घटनास्थळी दाखल झाला मात्र तोपर्यंत हा कचरा खाक झाला झाला. या इमारतीच्या खिडक्या व दरवाज्यांना बसवण्यात आलेली लकाडी फ्रेम्स या आगीत जळाल्या.

याप्रकरणी केलेल्या चौकशीत आग कशी लागली यासंदर्भात तेथे उपस्थित असलेले कामगार त्याबाबत माहिती देऊ शकले नाहीत, अशी माहितीअग्निमशन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com