Goa Petrol-Diesel Price  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Diesel Price: गोव्यातील इंधन दरांत बदल; जाणून घ्या पेट्रोल-डीझेलच्या आजच्या किंमती

पेट्रोलियम उत्पादनांच्या जागतिक दरांचा देशांतर्गत दरांवर होतो परिणाम

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेलच्या किंमतींमध्ये सोमवारी किरकोळ बदल झाला. पणजी आणि उत्तर गोव्यातील दरांमध्ये किरकोळ वाढ झाली तर दक्षिण गोव्यातील दरांमध्ये घट झाली.

मंगळवारी 18 एप्रिल रोजी पणजी आणि उत्तर गोवा येथे पेट्रोल दरांमध्ये प्रतीलीटर 6 पैशांची वाढ झाली. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल दरात प्रतीलीटर 57 पैशांची घट झाली. उत्तर गोवा आणि पणजीतील डीझेल दरांमध्ये प्रतीलीटर 5 पैशांची वाढ झाली तर दक्षिण गोव्यातील डीझेल दरामध्ये प्रतीलीटर 55 पैशांची घट झाली.

जागतिक स्तरावरील क्रुड ऑईलच्या दरांमध्ये होणाऱ्या बदलांवरून तेलकंपन्या दररोज पेट्रोल-डीझेल या इंधन दरांत बदल करतात. त्यामुळे दररोज या इंधन दरांमध्ये चढ उतार होत असतात.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.90

Panjim ₹ 97.90

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.44

Panjim ₹ 90.44

South Goa ₹ 89.68

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT