G20 Summit 2023 In Goa: 'वैद्यकीय पर्यटनासाठी भारत नेहमीच अग्रेसर'; गोव्यातील G20 बैठकीच्या पहिल्या दिवशी काय झालं?

भारताच्या अध्यक्षतेखाली जी-20 समूहाच्या आरोग्य विषयक कृती गटाची दुसरी बैठक सध्या गोव्यात पणजी येथे सुरु आहे.
G20 In Goa
G20 In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

G20 Summit 2023 In Goa: भारताच्या अध्यक्षतेखाली जी-20 समूहाच्या आरोग्य विषयक कृती गटाची दुसरी बैठक सध्या गोव्यात पणजी येथे सुरु आहे.

बैठकीच्या पहिल्या दिवशी भारताच्या जी-20 आरोग्य ट्रॅकसंदर्भातील तीन प्राधान्यक्रमांच्या अनेक पैलूंबाबत विविध विचारमंथन सत्रांचे आयोजन करण्यात आले.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार, आणि केंद्रीय पर्यटन तसेच बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून अनुक्रमे बीजभाषण तसेच विशेष मार्गदर्शन केले.

"भारताचा जी-20 प्राधान्यक्रम 21व्या शतकातील अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी योग्य ठरेल अशा जबाबदार, सर्वसमावेशक अशा बहुपक्षवादावर लक्ष केंद्रित करत आहे." असे डॉ. भारती प्रवीण पवार म्हणाल्या.

आरोग्य विषयक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांवर मंत्री श्रीपाद नाईक यांनी भर दिला. 'भारत हा नेहमीच वैद्यकीय पर्यटनासाठी अग्रेसर असलेल्या ठिकाणांपैकी एक ठरला आहे.' असे नाईक म्हणाले यावेळी त्यांनी गेल्या काही वर्षांत भारतात झालेल्या अभिनव उपक्रमांचे तसेच डिजिटल आरोग्यसुविधा क्षेत्रातील यशोगाथांचे दर्शन घडविणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

उद्घाटनानंतर, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ञ आणि महत्त्वाच्या भागधारकांची भाषणे झाली.

यावेळी भारतीय सार्वजनिक आरोग्य विश्वस्त संस्था (PHFI) चे माजी अध्यक्ष आणि सुप्रसिध्द प्राध्यापक के. श्रीनाथ रेड्डी, जागतिक आरोग्य संघटनेतील एएमआरसाठीचे सहाय्यक महासंचालक डॉ. हनन एच.बाल्की तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्यविषयक आपत्कालीन स्थिती कार्यक्रमाचे विशेष संचालक डॉ.मायकेल रायन या महत्त्वाच्या वक्त्यांची भाषणे झाली.

G20 In Goa
Pakistan China: ईशनिंदा करणाऱ्या चीनच्या अधिकाऱ्याला पाकिस्तानात अटक, मृत्युदंडाची शिक्षा होणार?

दुसऱ्या सत्रात, “सुरक्षित, परिणामकारक, दर्जेदार आणि किफायतशीर प्रतिबंधक वैद्यकीय उपाययोजना मिळण्याची संधी तसेच उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करून औषध निर्माण क्षेत्रातील सहकार्य बळकट करणे” या विषयावरील चर्चा विविध पातळ्यांवरील अधिक उत्तम सहयोगात्मक संबंध निर्माण करण्याच्या मुद्द्याशी संबंधित होती.

वैद्यकीय उपाययोजनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारी आणि खासगी भागीदारी असो किंवा विविध मंचाच्या समन्वयातून आंतरराष्ट्रीय सहकारी संबंध निर्माण करणे असो, अशा प्रत्येक बाबीवर विचारमंथन करण्यात आले.

यावेळी नीती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य डॉ.विनोद के.पॉल यांनी देशात भरभराटीला येत असलेल्या डिजिटल आरोग्यसेवा आणि औषधनिर्माण क्षेत्र यांच्यावर प्रकाश टाकला.

G20 In Goa
UP पुन्हा हादरले! परीक्षा देऊन घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीची गोळ्या झाडून हत्या

त्यानंतर जी 20 सदस्य देशांमध्ये फलनिष्पत्ती संदर्भातील दस्तऐवजाच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली. पुराव्यावर आधारित, सर्वसमावेशक, न्याय्य, समान, पारदर्शक आणि गरजेवर आधारित उपायांद्वारेच सहमती व्हावी यावर भर देण्यात आला.

या सत्रानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डिजिटल आरोग्याशी निगडित भारतात आणि परदेशात अंमलात येत असलेल्या विविध सर्वोत्तम पद्धतींविषयी माहिती देणाऱ्या प्रदर्शनाला भेट दिली.

पहिल्या दिवसाच्या शेवटी गोव्याच्या समृद्ध संस्कृती आणि आदरातिथ्य याची ओळख करून देणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. अग्वाद किल्ला परिसरात आयोजित केलेल्या भोजन समारंभाने पहिल्या दिवशीच्या बैठकीची सांगता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com