Apple Store launch in Mumbai: अ‍ॅपलच्या CEO ने धकधक गर्लसोबत मारला मुंबईच्या वडापाववर ताव

Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक आयफोन कंपनीच्या भारतातील पहिल्या स्टोअरचे उद्धाटन करणार आहेत.
Tim Cook And Madhuri Dixit Nene
Tim Cook And Madhuri Dixit NeneTwitter

Apple Store launch in Mumbai: Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक आयफोन कंपनीच्या भारतातील पहिल्या स्टोअरचे उद्धाटन करणार आहेत. मंगळवारी BKC बिझनेस डिस्ट्रिक्ट येथे हे स्टोेर सुरू होणार आहे, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यासाठी सध्या स्वत: टीम कुक सध्या मुंबईत दाखल झाले आहेत.

टीम कुक यांनी स्टोअरच उद्धाटन करण्यापूर्वी तेथील टीमची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबईचा फेरफटका मारत प्रसिद्ध मुंबई वडापाववर देखील ताव मारला.

(Madhuri Dixit introduces Tim Cook to Vada Pav)

टीम कुक यांच्यासोबत यावेळी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री धकधक गर्ल माधुरी दीक्षित होती. दोघांनी देखील वडापावचा स्वाद घेतला. माधुरी दीक्षितने स्वत: या भेटीचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे.

मुंबईत स्वागत करण्याचा वडापावपेक्षा चांगला मार्ग नाही. असे कॅप्शन फोटो शेअर करताना माधुरी दीक्षितने दिले आहे. तर, त्याला उत्तर देताना माझ्या पहिल्या वडापावसोबत ओळख करून देण्यासाठी धन्यवाद माधुकी दीक्षित, चव उत्तम होती. असे ट्विट कुक यांनी केले आहे.

Tim Cook And Madhuri Dixit Nene
Delhi: देशातील पहिल्या सरकारी 5 स्टार हॉटेलचे होणार खासगीकरण, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

दरम्यान, Apple कंपनीला देशात 25 वर्षे पूर्ण झाल्यामुळे मुंबईत स्टोअर सुरू केले जात आहे. जगातील एक प्रतिष्ठित ब्रँडचे स्टोअर उघडत असत्याने तेथील पहिले ग्राहक बनण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

"भारताची संस्कृती खूप सुंदर असून, येथे एक अविश्वसनीय ऊर्जा आहे. आमच्या ग्राहकांना पाठिंबा देणे, स्थानिक समुदायांमध्ये गुंतवणूक करणे आणि मानवतेची सेवा करणार्‍या नवकल्पनांसह चांगले भविष्य घडवण्यासाठी एकत्र काम करण्याची आमची ईच्छा आहे." असे कुक यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com