Chandrashekhar Vast on BJP Government Dainik Gomantak
गोवा

खाण घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा शिक्षणात विभागात : चंद्रशेखर वस्त

भाजपने भ्रष्टाचार करत वास्कोचा विकास न केल्याचा गंभीर आरोप

दैनिक गोमन्तक

वास्को : गोव्यात खाण घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा शिक्षणात विभागातून होत आहे. यात काँग्रेस, मगो, भाजप नेतेच भ्रष्टाचार करीत असलेले आहे. वास्को पूर्ण सुविधांनी सजलेले शहर होते. परंतु आज वास्कोची स्थिती बांगलादेशासारखी करून ठेवली आहे. याला पूर्णपणे जबाबदार राज्य सरकार व येथील पालिका मंडळ असल्याचा खळबळजनक आरोप वास्को मतदार संघाचे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर वस्त यांनी केला. (Chandrashekhar Vast on BJP Government News Updates)

वास्को मतदार संघाचे अपक्ष उमेदवार तथा समाज कार्यकर्ते चंद्रशेखर महादेव वस्त यांनी वास्को मुरगाव पालिकेसमोर आयोजित जाहीर सभेत सरकारवर निशाणा साधला. यावेळी पुढे बोलताना चंद्रशेखर वस्त म्हणाले की, वास्को (Vasco) मतदारसंघ विकासापासून दुर्लक्षित राहिला तो येथील लोकप्रतिनिधी व मुरगाव नगरपालिका मंडळाच्या संगीत खुर्ची मुळे. वास्कोचा विकास करण्यास येथील आमदार, मंत्री पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचा आरोप वस्त यांनी केला.

भाजपचे उमेदवार कृष्णा साळकर यांनी 2 हजार 80 चौरस मीटर कोमुनिदाद जागेत करोडो रुपयांचा घोटाळा केला असून त्याचे सर्व पुरावे माझ्याजवळ असल्याने निवडणुकीनंतर (Goa Assembly Elections) त्याचा न्यायालयात कायदेशीर लढाई करणार अशी माहिती वस्त यांनी दिली. तसेच साळकर यांनी मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाचे चेअरमन राहून अनेक इमारतीतील घोटाळे केले असल्याचा खळबळजनक आरोप चंद्रशेखर वस्त यांनी केला आहे. वास्कोत सुसज्ज असे मासळी मार्केट नाही, बसस्थानक उपलब्ध नाही, याला सत्ताधारी राजकीय पक्ष जबाबदार असल्याचा आरोप वस्त यांनी दिली.

प्रकाश वस्त यांनी भाजप (BJP) सरकारने मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा निशाणा साधला. वास्को इंडियन ऑईल कंपनीत पेट्रोल घोटाळा, नाफ्ता प्रकरणात भाजप व काँग्रेस पक्षाची मिलीभगत होती. पक्षनीती न सांभाळणारे राजकीय नेते भ्रष्टाचार करीत करून करोडो रुपयांचे धनी झाले आहेत. मात्र जनता अजूनही योजना व विकासाची वाट पाहत आहे, असा आरोपही वस्त यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT