Draupadi Murmu|Chandralekha Mistry Dainik Gomantak
गोवा

National Teachers Award: शिक्षकी पेशा आव्हान म्हणून स्वीकारावा! राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चंद्रलेखा मेस्त्रींची प्रतिक्रिया

President Draupadi Murmu: चंद्रलेखा मेस्त्री, नताशा कार्व्हालो, विजय च्यारी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते बहुमान प्रदान; विविध राज्यांमधील ८५ हून अधिक शिक्षक या सोहळ्यात सहभागी

गोमन्तक डिजिटल टीम

National Teachers Award 2024

पणजी: यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काणकोणच्या सत्यवती सोयरू आंगले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका चंद्रलेखा दामोदर मेस्त्री यांना जाहीर झाला होता. आज त्यांना दिल्लीतील राष्ट्रीय शिक्षक दिन कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कार देण्यात आला. ‘हा अद्वितीय आनंद शब्दांत व्यक्त करू शकत नाही’, अशी प्रतिक्रिया या सत्कारमूर्तींनी व्यक्त केली.

केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाचा पुरस्कार म्हापसा आयटीआयच्या नताशा कार्व्हालो आणि काकोडा आयटीआयचे विजय च्यारी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

कौशल्य विकास मंत्रालयाचा पुरस्कार मिळालेल्या आयटीआय शिक्षिका नताशा कार्व्हालो म्हणाल्या की, हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. माझ्यासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे.

देशातील विविध राज्यांमधील ८५ हून अधिक शिक्षक या सोहळ्यात सहभागी झाले होते. पुरस्कार सोहळ्यानंतर शिक्षणमंत्री आणि कौशल्य विकास मंत्र्यांसोबत सायंकाळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शिक्षकी पेशा आव्हान मानावे!

बहुमूल्य अशा राष्ट्रीय पुरस्काराविषयी शिक्षिका चंद्रलेखा मेस्त्री यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, मी पहिल्यांदाच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज केला होता आणि तो मला मिळाला याचे समाधान आहे; परंतु शिक्षकांनी सदोदित आपला पेशा हे आव्हान म्हणून स्वीकारायला हवे.

बी.एड. अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना जे शिकविले जाते, ते प्रत्यक्षात उतरविणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. या सोहळ्यात सहभागी होणे, ही माझ्यासाठी एक अविस्मरणीय घटना आहे.
चंद्रलेखा मेस्त्री, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षिका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT