Hasapur Bridge Dainik Gomantak
गोवा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

Pernem Bridge Construction:हसापूर येथील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, आवश्यकता भासल्यास दुचाकी व हलक्या चारचाकी वाहनांना या पुलावरून वाहतुकीस मुभा देण्यात येईल.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पेडणे: हसापूर येथील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, आवश्यकता भासल्यास दुचाकी व हलक्या चारचाकी वाहनांना या पुलावरून वाहतुकीस मुभा देण्यात येईल. मात्र महिनाभर कोणत्याही अवजड वाहनांना या पुलावरून वाहतूक करण्यास परवानगी दिली जाणार नाही.त्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंना सहा फूट उंचीचे हाइट बॅरियर बसवण्यात येणार असल्याची माहिती पेडणे सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंते शिवनाथ गावस यांनी दिली.

गावस यांनी सांगितले की, हसापूर पूलाचे २७ मे रोजी काँक्रीट टाकून काम पूर्ण झाले आहे. वाहतुकीसाठी पूल खुला करण्यासाठी किमान एक महिना पूर्ण होणे आवश्यक असते. या पुलाच्या काँक्रीटला सध्या केवळ १२ दिवस पूर्ण झाले आहेत. कोणत्याही अवजड वाहनाने या पुलावरून वाहतूक करू नये, अन्यथा पुलाला धोका निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलाच्या दोन्ही बाजूंना कमी उंचीचे हाइट बॅरियर बसवण्यात आले आहेत, जेणेकरून अवजड वाहनांना या पुलावरून जाता येणार नाही.

नदीला पूर आल्याने वाहतुकीस त्रास...

या पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पर्यायी मार्गाने वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र रविवारी रात्री कळणे, सिंधुदुर्ग येथील खाणीचे पाणी सोडल्यामुळे नदीला पूर आला आणि या मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. मात्र सकाळी ही स्थिती निवळली आणि पर्यायी मार्गाने वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास दुचाकी व हलक्या चारचाकी वाहनांना या पुलावरून वाहतुकीची मुभा देण्यात येईल. तसेच महिन्यानंतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा पूल खुला करण्यात येईल, असे सहाय्यक अभियंते गावस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT