Goa Rain  Dainik Gomatak
गोवा

उत्तर आणि दक्षिण गोव्यात आज पावसाची शक्यता

दैनिक गोमन्तक

आज पहाटेच्या दरम्यान गोव्यात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज गोव्यात पावसाची शक्यता आहे. याबरोबर 13 आणि 16 मे रोजी उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा ही अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Chance of rain in North and South Goa today )

गोव्यात गेल्या तीन ते चार दिवसात ढगाळ वातावरण असुन 12 मे रोजी पहाटे ही पावसाच्या तुरळक सरी पणजी शहर आणि परिसरात बरसल्या आहेत. हा पाऊस कमी वेळ असला तरी सकाळी काही वेळ सुरु असणाऱ्या पावसाने नागरिकांच्या दैनंदिन कामांनमध्ये काहीसा व्यत्यय आला होता.

असनी चक्रीवादळामुळे वातावरणात झाला बदल

गोव्यात 13 मे पर्यंत ठीकठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली होती. बंगालच्या उपसागरावर असनी चक्रीवादळाच्या इफेक्टमुळे वातावरणात बदल झाल्याचे IMD ने सांगितले आहे. आणि त्यामुळेच गोव्यासह संपूर्ण देशात ठिकठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता होती. आज पहाटे गोव्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यावरील लोकांची तारांबळ उडाली.

पणजीसह, ओल्ड गोवा, माशेल, साखळी, वाळपाईमध्ये पावसाच्या बारीकमोठ्या सरी बरसल्या आहेत. 'असनी चक्रीवादळामुळे, वारे खालच्या पातळीवर पश्चिमेकडे वाहत आहे, ज्यामुळे गोव्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. पण पावसाच्या आगमनामुळे गोवेकरांना गारवा अनुभवायला मिळाला. वाढलेल्या गरमीमुळे सर्वच जण हैराण झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT