आयकर निरीक्षक मनिंदर सिंग अट्टारींचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

आदित्य वर्मा आणि दीपक कुमार या संशयितांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर
Maninder Singh Attari
Maninder Singh AttariDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : आपल्यासोबत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पणजीतील 3 आयकर निरीक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तिंघांवरही लैंगिक छळ करणे, वाईट नजरेने पाहात राहणे आणि महिला कर्मचार्‍याशी अपमानजनक वागणे अशा आरोपांखाली पणजी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Income tax inspector Maninder Singh Attari pre-arrest bail application rejected by court)

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत संशयित मनिंदर अत्तारी याच्याविरुद्ध लैंगिक छळ आणि सतावणुकीचे आरोप केले आहेत. यासोबतच संशयित दीपक कुमार आणि आदित्य वर्मा हे वाईट नजरेने पाहत असल्याचे आरोप केले होते. या दोघा संशयिताविरुद्ध असलेले आरोप जामीनपात्र असल्याने न्यायालयाने त्यांना शर्ती घालून काल जामीन मंजूर केला होता. तर आज मुख्य संशयित आयकर निरीक्षक मनिंदर सिंग अट्टारी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. तर आदित्य वर्मा व दीपक कुमार या संशयितांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Maninder Singh Attari
शाहबाज सरकार भारतापुढे झुकले! पाकिस्तानी संतप्त

संशयित मनिंदर याच्याविरुद्धचे आरोप अजामीनपात्र असून त्याच्याविरुद्धचे पुरावे या पीडित महिलेने तक्रारीसोबत जोडले आहेत. त्यामध्ये अश्‍लिल व्हॉटस्अप मेसेज तसेच तिला कार्यालयातून घरी जाताना वाटेत अडवणे, असे आरोप करण्यात आले आहेत. प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात असल्याचा तसेच सीसीटीव्ही फूटेज आणि डीव्हीआर खात्याकडून देण्यात आलेला नसल्याने अधिक चौकशीसाठी त्याची पोलिस कोठडी आवश्‍यक असल्याने जामीन दिला जाऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

मनिंदर आणि दीपक यांनी याबाबत बाहेर कुठेही वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा आशयाची धमकी दिल्याचंही तक्रारीत सांगण्यात आलं आहे. पणजी पोलीस स्टेशनचे निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लॉरिन सिक्वेरा याप्रकरणी तपास करत असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नसल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com