Goa Mining Case Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: मयेतील खनिज वाहतुकीस न्यायालयात आव्हान

Goa Mining: आज होणार सुनावणी: वातावरण शांत, तरी आंदोलनाची धग कायम

दैनिक गोमन्तक

Goa Mining: मये गावातून पोलिस बंदोबस्तात खनिज वाहतूक सुरू असतानाच त्याला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आज सादर करण्यात आली. त्यावर येत्या बुधवारी प्राथमिक सुनावणी होणार आहे. मयेतील शेतकरी व गोवा फाउंडेशन यांनी संयुक्तपणे ही याचिका सादर केली आहे. या खनिज वाहतुकीला मदत करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.

यापूर्वी मये गावातून खनिज वाहतूक करण्यात येत होती. त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर खनिज वाहतूकदारांनी गावाबाहेरून खनिज वाहतूक करण्याची हमी दिली होती. त्यामुळे न्यायालयाने याचिका निकाली काढली होती. त्यामुळे आता वाहतूक सुरू होणे

हा न्यायालयाचा अवमान ठरत नसल्याने आता नव्याने याचिका सादर करण्यात आली आहे. यापूर्वीच्या याचिकेदरम्यान झालेल्या कामकाजाची माहितीही या याचिकेत आता देण्यात आली आहे.

फाउंडेशनचे संचालक डॉ. क्लॉड आल्वारीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, खनिज वाहतूक प्रकरणी खाण खात्याने शेतकऱ्यांची, मयेतील ग्रामस्थांची जी फसवणूक केली आहे ती याचिकेत मांडण्यात आली आहे.

गावातून वाहतूक करण्यासंदर्भात यापूर्वी न्यायालयात विषय पोचल्यावर गावाबाहेरून खनिज वाहतूक करण्याची हमी देण्यात आली होती. ती आता अन्य प्रकरणात पाळण्यात आली आहे. तांत्रिकदृष्ट्या या दोन्ही घटना वेगवेगळ्या असल्या तरी फटका बसणारे ग्रामस्थ तेच आहेत आणि प्रश्नही तोच आहे. त्यामुळे पूर्वीच्या घटनांची माहितीही न्यायालयाला देण्यात येणार आहे.

खनि ज वाहतूकप्रश्नी आज मये ग्रामस्थ पुन्हा रस्त्यावर उतरणार असा अंदाज होता. मात्र, आज तसे काही घडले नाही. खनिज वाहतुकीविरोधात लोक रस्त्यावर उतरलेच, तर आंदोलन मोडून काढण्यासाठी मयेत पोलिस तैनात करण्यात आले होते. प्रशासकीय अधिकारीही स्थितीवर लक्ष ठेवून होते.

अभयारण्यात खनिज साठ्यास आक्षेप

कुळे येथे भगवान महावीर अभयारण्यात खनिज साठा करण्याच्या प्रयत्नाला गोवा फाउंडेशनने आक्षेप घेतला आहे. अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी परवानगी लागते. अभयारण्यात खनिज उतरवण्यासाठी कोणाचीही परवानगी घेण्यात आलेली नाही. तेथे रेल्वे स्थानकही नाही. तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. हे सारे मुद्दे याचिकेत मांडण्यात आले असून उद्या त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी होणार आहे.

पोलिस बंदोबस्तात खनिज वाहतूक

गेल्या आठवड्यात दोनवेळा जनतेच्या विरोधास सामोरे जावे लागल्यानंतर आजपासून पोलिस बंदोबस्तात मयेतून खनिज वाहतूक सुरू झाली आहे. दुसऱ्या बाजूने खनिज वाहतुकीविरोधातील आंदोलन शांत झाल्याचे वाटत असले, तरी मये गावात अजूनही या आंदोलनाची धग कायम आहे. खनिज वाहतुकी विरोधात मयेतील जनता कोणत्याही क्षणी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. मयेतील अंतर्गत रस्त्याने खनिज वाहतूक नकोच. असा पवित्रा मयेतील जनतेने घेतला आहे. आज लोक रस्त्यावर उतरले नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT