St. Xavier's Exposition  Dainik Gomantak
गोवा

St. Xavier's Exposition: पोप फ्रान्सिस यांना निमंत्रित करण्यात भाजपचे डबल इंजिन सरकार अपयशी !!

Exposition in Goa: परराष्ट्र मंत्रालयाकडून पोप फ्रान्सिस यांना निमंत्रण गेले नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Pope Francis Invite to Goa

ओल्ड गोवा येथील सेंट फ्रान्सिस झेवियर्स यांच्या अवशेषाच्या प्रदर्शनात पोप फ्रान्सिस यांना निमंत्रित करण्यात केंद्राच्या अपयशामुळे गोव्यातील ख्रिश्चन समुदाय निराश झाला आहे. पोप फ्रान्सिस यांना निमंत्रित करण्यात भाजापचे डबल इंजिन सरकार अपयशी ठरल्याने स्थानिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.

द गोवन या वृत्तपत्राच्या बातमीनुसार पोप फ्रान्सिस यांच्या भेटीने इतिहास घडवला असता आणि गोव्यात मोठा आनंद आणि आध्यात्मिक समन्वय निर्माण झाला असता असे फोंड्यातील एक धर्मगुरू म्हणालेत. ख्रिस्ती धर्माच्या धर्मगुरूंची भारत भेट फारच महत्वाची होती असे त्यांचे म्हणणे आहे.

कॅथॉलिक असोसिएशन ऑफ गोवा (CAG) ने देखील या संधर्भात निराशा व्यक्त केली असून म्हटले आहे की मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विनंतीनंतरही प्रधानमंत्र्यांच्या ऑफिचे मौन कायम होते. परराष्ट्र मंत्रालयाकडून पोप फ्रान्सिस यांना कोणतेही निमंत्रण गेले नाही, आणि ही अत्यंत खेदजनक बाब आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Madgaon Massacre 1890: स्मरण मडगाव हत्याकांडाचे! 21 सप्टेंबर 1890 रोजी मतदानाचा अधिकार मागणाऱ्या निःशस्त्र गोवेकरांवर गोळीबार; 23 जणांचा बळी

Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

SCROLL FOR NEXT