Goa River Survey Dainik Gomantak
गोवा

Goa River Survey: नद्यांचा प्रवाह, पाण्याचा वेगही मोजणार; जल आयोग करणार पाहणी, शुक्रवारपासून सर्वेक्षणाला सुरवात

Central Water Commission Survey: गोव्यातील प्रमुख नद्यांमध्ये केंद्रीय जल आयोगाकडून नदी प्रवाह व पाण्याच्या वेगाचे सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोव्यातील प्रमुख नद्यांमध्ये केंद्रीय जल आयोगाकडून नदी प्रवाह व पाण्याच्या वेगाचे सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहे. नदीपात्रांमध्ये प्रत्यक्ष जाऊन नदी प्रवाह आणि पाण्याच्या वेगाची मोजणी केली जाणार आहे. माहितीनुसार, २८ मे रोजी पणजीजवळील मांडवी नदी परिसर आणि फिशरीज जेटी येथे मोजणी करण्यात येणार आहे.

२९ मे रोजी केरी येथे तेरेखोल नदीत, आरोंदा-किरणपाणी पुलाच्या सुमारे १०० मीटर खालच्या बाजूस सर्वेक्षण होणार आहे. तर ३० मे रोजी दोन ठिकाणी अभ्यास करण्यात येणार असून, कोळवाळ-धारगळ पुलाच्या सुमारे २०० मीटर वरच्या बाजूस शापोरा नदीत तसेच बोरी पुलाच्या सुमारे २०० मीटर खालच्या बाजूस झुआरी नदीत मोजणी केली जाणार आहे. आयोगातर्फे येत्या काही दिवसांत गोव्यातील विविध नदी परिसरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

या अभ्यासातून मान्सूनपूर्व नदी प्रवाहाची मूलभूत माहिती संकलित करण्यात येणार असून, भविष्यातील पूरपूर्व अंदाज, जलसंपदा व्यवस्थापन तसेच पर्यावरणीय अभ्यासासाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर बंदर कप्तान खात्याने सर्व जहाजे, बार्ज, मासेमारी नौका आणि प्रवासी बोटींसाठी सावधानतेचा इशारा जारी केला आहे. या कालावधीत सर्व नौकांनी गती कमी ठेवावी, अभ्यास कार्यात अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे कळविले आहे.

आपत्ती व्यवस्थापनासाठीही माहिती उपयुक्त

केंद्रीय जल आयोगाच्या या उपक्रमामुळे राज्यातील नदीप्रवाहाच्या स्वरूपाचा अधिक अचूक अभ्यास होण्यास मदत होणार असून, भविष्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठीही ही माहिती उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT