Goa Central Library Dainik Gomantak
गोवा

Central Library: सेंट्रल लायब्ररीतील दस्तावेज धोक्यात

Central Library: वातानुकूलन सेवा बंद : खंडपीठाकडून स्वेच्छा दखल; बजावली नोटीस

दैनिक गोमन्तक

Central Library: पाटो प्लाझा येथील कृष्णदास श्‍यामा वाचनालयातील वातानुकूलन सेवा 2019 वर्षापासून बंद आहे. त्यामुळे सुमारे 40 हजारांहून अधिक पुस्तके असलेल्या ऐतिहासिक दस्तावेजाला धोका निर्माण झाला आहे.

सदर दस्‍तावेजांचे जतन करण्याची गरज असताना दुर्लक्ष केले जात असल्याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वेच्छा जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. तसेच राज्य सरकारला नोटीस बजावून काही शिफारशी केल्या आहेत. ईशान उसपकर यांची ॲमिकस क्युरी म्हणून नियुक्ती करून पुढील सुनावणी 11 डिसेंबर 2023 रोजी ठेवली आहे.

या स्वेच्छा जनहित याचिकेत राज्य सरकार, गोवा राज्य वाचनालय मंडळ, गोवा राज्य वाचनालय विकास कक्ष, राज्य ग्रंथपाल, ऐतिहासिक कालीन पुरातत्व व पुरातन खात्याचे संचालक व सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता प्रतिवादी करण्यात आले आहे. गोवा राज्य ग्रंथपालांनी वाचनालयाच्या परिस्थितीसंदर्भात, जतनासाठी व संवर्धनासाठी उचलण्यात आलेल्या पावलांबाबत 6 डिसेंबर 2023 पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे असे निर्देश दिले आहेत.

पाटो प्लाझा येथील कृष्णदास श्‍यामा वाचनालयाच्या परिस्थितीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल गोवा खंडपीठाने घेतली आहे. राज्यातील हे वाचनालय इतिहासकालीन पुस्तकांचा ठेवा असलेले श्‍वसन आहे.

दुर्मिळ पुस्तके खराब झाल्यास पुन्हा ती मिळणे कठीण आहे. गेली चार वर्षे हा दस्तावेज वातानुकूलन बंद असल्याने निकामी होत आहे व त्याची किंमत भरून न येणारी आहे, असे निरीक्षण गोवा खंडपीठाने वाचनालयाच्या स्थितीची दखल घेत केले आहे.

गोवा राज्य वाचनालय मंडळ व वाचनालय विकास कक्ष स्थापन करून त्याच्या बैठका घेण्यात येत आहेत का? वाचनालयासाठी येणाऱ्या निधी विनियोगासंदर्भात माहिती प्रतिज्ञापत्रात राज्य ग्रंथपालांनी नमूद करावी, असे निर्देशात म्हटले आहे.

या वाचनालयातील स्थितीबाबत वृत्तात नमूद मुद्दे खरे असल्यास प्रथमदर्शनी सरकारचे दुर्लक्ष गंभीर आहे. गोवा सार्वजनिक वाचनालय कायदा 1993 व नियमानुसार सरकारने व संबंधित एजन्सीने त्वरित पावले उचलण्याची गरज आहे. 40 हजार पुस्तकांची काळजी वाटत आहे, अशी भीती ‘ज्ञानपीठ’ विजेते दामोदर मावजो यांनी प्रतिक्रियेत व्यक्त केली होती.

पुस्तकांची देखभाल कशी करणार ?

नादुरुस्त असलेली वातानुकूलन यंत्रणा केव्हापर्यंत व दुरुस्त करून ती कार्यान्वित केली जाईल. वातानुकूलन दुरुस्तीसाठी वाचनालयाने सरकारला पाठविलेली फाईल कोठे, किती दिवस प्रलंबित आहे. वातानुकूलन यंत्रांच्या दुरुस्तीत काय अडचणी येत आहेत. दुरूस्ती होईपर्यंत पुस्तकांचे कसे जतन केले जाणार आहे,अशी विचारणाही खंडपीठाने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT