Ferries Boat: फेरीबोट महागली; चारचाकींसाठी 40 रु.

Ferries Boat: दुचाकींना 5 रुपये : मासिक पासही उपलब्‍ध; 15 दिवसांत अंमलबजावणी
Goa Ferry Boat
Goa Ferry BoatDainik Gomantak

Ferries Boat: राज्याच्या जलवाहतुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या फेरीबोटीचे वाहतूक दर आता महागणार आहेत. सरकारच्या नदीपरिवहन खात्याने नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी मासिक पासची सोय केली आहे. दुचाकीस्‍वाराला मासिक 150 रुपये तर चारचाकी वाहनासाठी मासिक 600 रुपये आकारले जाणार आहेत.

Goa Ferry Boat
Tiger Project: व्याघ्र प्रकल्पाबाबत सरकार ‘बॅकफूट’वर

पास नको असल्‍यास प्रत्‍येकवेळी दुचाकीसाठी 5 रुपये आणि चारचाकीसाठी 40 रुपये मोजावे लागतील. येत्या 15 दिवसांत त्‍याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी ही माहिती दिली.

मंत्री फळदेसाई म्हणाले की, राज्यात दळणवळणाच्या क्षेत्रात फेरीबोटीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक गावे, वस्त्या, नद्या, उपनद्या, समुद्राचे बॅक वॉटर जेथे पूर्णपणे तुटलेल्या आहेत, तेथे फेरीबोट अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सरकारमार्फत पहाटेपासून रात्रीपर्यंत ही सेवा अविरतपणे सुरू असते.

फेरीबोटीमध्ये केवळ चारचाकी वाहनांसाठी शुल्क आकारणी होत असे. आता नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मासिक पासची सोय करण्यात येणार आहे. पास ऑनलाईनही मिळवता येतील, असे मंत्री फळदेसाई म्‍हणाले.

येत्या सहा महिन्यांत रो-रो सेवा

राज्यातील जलमार्ग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नदीपरिवहन खात्यामार्फत प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पारंपरिक फेरीबोटीपेक्षा मोठ्या, तीनपट जास्त क्षमतेच्या रो-रो फेरीबोटी सुरू करण्यात येणार आहेत. ही सेवा पुढील सहा महिन्यांत कार्यान्वित होईल, अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com