Celebration of devotion in Shirgao
Celebration of devotion in Shirgao Dainik Gomantak
गोवा

शिरगावात फुलला भक्तीचा मळा!

दैनिक गोमन्तक

डिचोली: ‘श्री लईराई माता की जय’चा जयघोष आणि पारंपरिक विधींसह शिरगावच्या श्री लईराई देवीच्‍या जत्रोत्‍सवाला मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. शुक्रवारी पहाटे अग्निदिव्य आदी पारंपरिक विधी झाल्यानंतर जत्रेच्या प्रमुख उत्सवाची सांगता झाली. आता सोमवार दि. 9 मेपर्यंत कौलोत्सव साजरा होणार आहे.

श्री लईराई देवीची जत्रा देश-विदेशात प्रसिद्ध असून, हजारो भक्तांचे ते श्रद्धास्थान आहे. भक्तांच्या हाकेला पावणारी देवी अशी तिची कीर्ती आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा देवीचे अग्निदिव्य प्रत्यक्ष अनुभवण्याचा योग भाविकांना मिळाला. मध्यरात्री श्री लईराई मातेचे होमकुंडाजवळ आगमन झाल्यानंतर हजारो भक्तगणांच्या साक्षीने होमकुंडाला अग्नि पेटविण्यात आला. मध्यरात्र ते पहाटेपर्यंत होमकुंड उत्सव साजरा करण्यात आला. रखरखत्या निखाऱ्यांतून धोंड भक्तगणांसह लईराई देवीने अग्निदिव्य केले.

गावात भक्तिमय वातावरण

जत्रोत्‍सवानिमित्त संपूर्ण शिरगाव गावात मंगलमय आणि भक्तिमय वातावरण पसरले आहे. अस्नोडा-शिरगाव रस्ता तसेच अनेक ठिकाणी कमानी उभारून आरास करण्यात आली आहे. श्री लईराई तसेच अन्य मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रंगरंगोटी करून घरांवरही रोषणाई करण्यात आली आहे. खाजे, हॉटेल्स, रेडिमेड कपडे आदी सामानांची दुकाने थाटण्यात आली आहेत. आज गुरुवारी सकाळपासूनच भाविकांची पावले श्री लईराई मातेच्या दर्शनासाठी शिरगावात वळू लागली होती. सायंकाळनंतर तर शिरगावात भक्तांचा महासागर लोटला.

प्रशासकीय यंत्रणा तैनात: लईराई देवीच्या जत्रेला लाखो भक्तगणांची उपस्थिती गृहीत धरून प्रशासकीय यंत्रणेने सर्व ती खबरदारी घेतली आहे. उत्‍सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. प्रमुख ठिकाणी टेहळणी तळ उभारण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसही वाहतुकीवर नियंत्रण ठेवून होते. अग्निशमन दल, रुग्णवाहीका आदी अत्यावश्यक सेवाही तैनात करण्यात आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

SCROLL FOR NEXT