गोव्यातील वाढत्‍या उष्णतेने 'दम्‍या'चे रुग्‍ण हैराण

तापमानात वाढ: विविध प्रकारच्या प्रदूषणाचाही फटका
Rising heat in Goa bothers patients of Asthma
Rising heat in Goa bothers patients of AsthmaDainik Gomantak

पणजी: कोरोना संकट काळात मास्‍क वापराचा अस्‍थमा (दमा) रुग्‍णांना फायदा झाला होता. या काळात घराबाहेर न पडल्‍याने तसेच सतत मास्‍क वापरामुळे दम्‍याच्‍या रुग्‍णांना दिलासा मिळाला होता. पण, आता वाढत्‍या उष्णतेमुळे दम्‍याचे रुग्‍ण हैराण झाले आहेत.

याबाबत गोमेकॉच्‍या क्षयरोग आणि फुफ्फूस विभागाचे प्रमुख डॉ. उदय काकोडकर यांनी सांगितले की, कोरोना काळात घराबाहेर पडण्यास निर्बंध होते. तसेच मास्‍कचा वापर सक्‍तीचा होता. आता कोरोनाची स्‍थिती आटोक्‍यात आल्‍याने सर्व व्‍यवहार सुरळित सुरू झाले आहेत. मास्‍कचा वापरही कमी झालेला आहे. मात्र सध्या दम्‍याचे रुग्‍ण वाढण्याचे किंवा या रुग्‍णांना होणारा त्रास वाढण्याचे प्रमुख कारण म्‍हणजे वाढलेली उष्णता होय.

Rising heat in Goa bothers patients of Asthma
म्हापशात प्रत्येक प्रभागात शिवप्रतिमा हव्याच!

कोरोना काळात सर्वच व्‍यवहार बंद असल्‍याने ध्वनी प्रदूषण, धूळ प्रदूषण, वायू प्रदूषण झाले नाही. तसेच दम्‍याचे रुग्‍ण घरातच राहिल्‍याने त्‍यांना फारसा त्रास जाणवला नाही. आता पुन्‍हा सर्व काही सुरू झाल्‍याने हर एक प्रकारचे प्रदूषण पुन्‍हा वाढले आहे. तसेच कधी नव्‍हे तेवढा उष्मा वाढल्‍याने या रुग्‍णांचा त्रास वाढत आहे. तापमान सरासरीपेक्षा अधिक वाढले किंवा कमी झाले तरी दम्‍याच्‍या रुग्‍णांसाठी हे चांगले वातावरण नसते. यंदा संपूर्ण भारतात उष्णतेची लाट आली आहे. गोव्‍यालाही उष्णतेचा तडाखा बसत आहे.

वाढत्‍या तापमानाचा परिणाम

राज्‍यात कधी तेवढे उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. गेल्‍या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले तरीही उष्णतेचे प्रमाण कमी झालेले नाही. पावसाळा अद्याप महिनाभर लांब आहे. मे महिन्‍याला आताच सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी तीन आठवडे आणखी तापदायक असतील. राज्‍यात सरासरी तापमान 25 ते 30 असते. यंदा मात्र 35 चा आकडाही तापमानाने ओलांडला. वाढते प्रदूषण, औद्योगिकीकरण, कचरा प्रदूषण, झाडांची कत्तल अशा अनेक कारणांमुळे तापमानात वाढ होत असल्‍याची माहिती पणजी वेधशाळेतून देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com