Ceiling light glass cover falls Dainik Gomantak
गोवा

Ravindra Bhavan : प्रेक्षकांमध्ये दिव्याचे आवरण पडते तेव्हा; मडगावात सरकारी इमारतींची दुरवस्था

रवींद्र भवनमध्ये खळबळ

दैनिक गोमन्तक

Ceiling light glass cover falls : नागरी आरोग्य केंद्राची भिंत कोसळलेल्या दिवसापासून मडगावमधील सरकारी इमारतींना वाईट दिवस आले आहेत. शुक्रवारी मडगाव पालिकेच्या सभागृहाबाहेरील व्हरांड्यात छताच्या प्लास्टरचे तुकडे निखळून पडले.

आज कहर म्हणजे, येथील रवींद्र भवनात कार्यक्रम सुरू असताना छतावरील दिव्याचे आवरण निखळून पडले. सुदैवाने यामुळे कोणाला दुखापत झाली नाही.

वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारांमुळे पालिका जुन्या इमारतींची निगा राखण्यात असमर्थ ठरत असल्याची टीका मडगावात केली जात आहे.

... अन् धोका टळला!

शनिवारी मडगावच्या रवींद्र भवनमधील कॉन्फरन्स सभागृहात छतावरील दिव्याचे आवरण निखळून खाली पडले. त्यावेळी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचा युवकांसाठी कार्यक्रम सुरू होता.

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि आमदार उल्हास तुयेकर यावेळी उपस्थित होते. सुदैवाने हे आवरण खुर्च्यांच्या दोन रांगांमध्ये पडले. त्यामुळे धोका टळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'धुरंधर' चा पाकड्यांना धसका? गल्लीबोळ्यामध्ये पोलिस सुरक्षा वाढवली, प्रत्येकाचं आयडी करतायत चेक, पाहा व्हिडिओ

Gogol Murder Case: घाेगळ खूनप्रकरणी नवी माहिती! सहआरोपीला बेंगळुरू विमानतळावर अटक VIDEO

PM Vishwakarma Scheme: ‘पीएम विश्‍‍वकर्मा’साठी 18575 जणांची नोंदणी! 1175 जणांना कर्ज मंजूर; 5706 जणांना ‘टुलकिट’

Ponda By Election: फोंड्यात रणधुमाळी! ‘मगो’ कार्यकर्त्यांना वळवण्‍यासाठी भाजपकडून रणनीती आखणी सुरू; प्रचारास येणार गती

New Rule for IPL 2026: आयपीएल 2026 साठी बीसीसीआयचे 'मिशन शिस्त'; मैदानावरील वर्तणुकीपासून सरावापर्यंत कडक नियम लागू

SCROLL FOR NEXT