Goa Power Tariff Hike : महागाईत गोयकारांना वीज दरवाढीचा ‘शॉक’; प्रतियुनिट इतक्या टक्क्यांची वाढ

चालू महिन्यातच बसणार ग्राहकांना ‘झटका’
Goa Electricity Department
Goa Electricity DepartmentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Power Tariff Hike: टोमॅटोसह अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले असतानाच ग्राहकांना जुलै महिन्यापासूनच वीज दरवाढीचा ‘शॉक’ बसणार आहे. सरकारने घरगुती आणि इतर श्रेणीतील ग्राहकांसाठी 20 ते 70 पैसे प्रतियुनिट इतके शुल्क तात्काळ लागू केले आहे.

Goa Electricity Department
lok sabha election 2024 : दिगंबर कामतना दक्षिण लोकसभेसाठी पहिली पसंती

मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. लो टेन्शन घरगुती, कृषी (सिंचन) आणि तात्पुरत्या पुरवठा जोडण्यांसाठी २० पैसे प्रतियुनिट वाढले असून, लो टेन्शन व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहक आणि लो टेन्शन हॉटेल उद्योग ग्राहकांसाठी प्रतियुनिट 70 पैसे शुल्क आकारले जात आहे.

तसेच होर्डिंग्ज आणि साईनबोर्डस्, तात्पुरते व्यावसायिक कनेक्शन, उद्योग क्षेत्रातील उच्च वीजदाबाचे ग्राहक आणि फेरो-मेटलर्जिकल पॉवर इंटेन्सिव्ह युनिट्ससाठी प्रतियुनिट ७० पैसे वाढवले आहेत.

चार्जिंगही महागले

प्रदूषणावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात असतानाच ईव्ही चार्जिंग स्टेशनवरील वीज शुल्क देखील प्रतियुनिट ७० पैसे वाढवले आहे. त्याचा भुर्दंड इलेक्ट्रिक वाहनधारकांना बसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com