CCTV In Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco News : सडा कचरा प्रकल्पात ‘सीसीटीव्ही’ लावणार

सीसीटीव्ही कॅमेरा व फायर हायड्रंट इत्यादी सीएसआर निधीअंतर्गत देण्यात यावेत, यासाठी गोवा शिपयार्डला पत्र देण्यात आले

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News : सडा येथील मुरगाव पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचऱ्याला आगी लागण्याचा घटना घडू लागल्याने मुरगाव पालिकेने गंभीर दखल घेतली आहे. तेथे कोणीतरी समाजकंटक आग लावत असल्याचा संशय आहे. त्यामुळे तेथे सीसीटीव्ही कॅमेरा तसेच फायर हायड्रंटची सुविधा उपलब्ध करण्याचा विचार असल्याचे मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज यांनी सांगितले.

सीसीटीव्ही कॅमेरा व फायर हायड्रंट इत्यादी सीएसआर निधीअंतर्गत देण्यात यावेत, यासाठी गोवा शिपयार्डला पत्र देण्यात आले आहे. त्यासंबंधी लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे, असे रॉड्रिग्ज यांनी स्पष्ट केले. सडाच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये गेल्या कित्येक वर्षात त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. या कचऱ्याच्या ढिगांना आग लागण्याचे प्रकार सतत घडतात.

जानेवारीत या प्रकल्पातील कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली होती. त्याची मुरगाव पालिकेने मुरगाव पोलिस स्थानकात तक्रार केली होती. परंतु, अद्याप त्यासंबंधी कोणतीही माहिती मिळालेली नसल्याचे रॉड्रिग्ज यांनी सांगितले. जानेवारीत लागलेली आग विझविण्यासाठी त्यावर माती ओतण्यात आली आहे. परंतु, अद्याप ती आग धुमसतच आहे.

कोण आग लावतो यासंबंधी माहिती मिळविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहेत. तसेच फायर हायड्रंट बसविण्यात यावेत, अशी सूचना वास्को अग्निशमन दलाने केली होती. यासंबंधी दखल घेताना गोवा शिपयार्डने सीसीटीव्ही कॅमेरा व फायर हायड्रंट द्यावेत, अशी विनंती एका पत्राद्वारे त्यांना करण्यात आली आहे.

लिओ रॉड्रिग्ज, नगराध्यक्ष, मुरगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KKR ला दुसरा 'मोठा' झटका! हर्षित राणानंतर आता 'हा' मॅचविनर खेळाडू IPL 2026 मधून बाहेर

Goa HSSC Result 2026: काऊंटडाऊन सुरू! अवघ्या काही तासांत 12 वीचा निकाल; 'या' सोप्या स्टेप्समध्ये पाहा तुमचा रिझल्ट

Viral Video: 'डायपर'चा असाही वापर! कोल्ड-ड्रिंक थंड ठेवण्यासाठी तरुणाचा 'देसी जुगाड', पाहा कसं बनवलं घरगुती मिनी फ्रीज

पदार्पण असावं तर असं! 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 पदार्पणातच झळकावलं शतक, रचले दोन विश्वविक्रम Watch Video

VIDEO: निरीक्षक नाईक पुन्हा कोलव्यात, ग्रामस्थ संतप्त; आमदार व्हिएगस यांनी पोलिस अधीक्षकांना विचारला जाब

SCROLL FOR NEXT