Goa POP Ganesh Idols: 'पीओपी'च्या गणेशमूर्तींवर कारवाई; 5 विक्रेत्यांना दंड, पण मूर्ती जप्तीचा पत्ता नाही! सरकारच्या कारवाईवर सवाल

Goa POP Ganesh Idols: मंडळाने दंड वसूल केल्यानंतरही संबंधित विक्रेत्यांकडील पीओपीयुक्त मूर्ती जप्त करणे, त्यांची विक्री थांबवणे किंवा परवाने रद्द करणे यांसारखी कठोर कारवाई झालेली नाही.
Goa POP Ganesh Idols
Goa POP Ganesh IdolsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गणेशोत्सवातील मूर्तींमध्ये पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’चे (पीओपी) प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीत आढळून आले. नियमभंग करणाऱ्या विक्रेत्यांवर केवळ दंडात्मक कारवाई करण्यात आली; मात्र, संबंधित मूर्ती जप्त करून त्यांची विक्री रोखण्यासाठी ठोस पावले उचलली नसल्याचे समोर आले आहे.

मंडळाने दंड वसूल केल्यानंतरही संबंधित विक्रेत्यांकडील पीओपीयुक्त मूर्ती जप्त करणे, त्यांची विक्री थांबवणे किंवा परवाने रद्द करणे यांसारखी कठोर कारवाई झालेली नाही. परिणामी, पर्यावरणाला घातक असलेल्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध राहिल्या. केवळ दंड भरून विक्रेत्यांनी कारवाईतून मार्ग काढल्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या उद्देशालाच हरताळ फासला गेल्याचे चित्र आहे.

Goa POP Ganesh Idols
Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

नियमानुसार पर्यावरणास घातक ठरणाऱ्या पीओपीच्या वापरावर निर्बंध आहेत. तरीही अनेक विक्रेत्यांकडे निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक पीओपी असलेल्या गणेशमूर्ती आढळून आल्या. मंडळाच्या तपासणीत हा प्रकार स्पष्ट झाल्यानंतर संबंधित विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पाच विक्रेते सापडले...

पीओपीचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असलेल्या गणेशमूर्ती आढळल्याने पाच विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यात सतीश कुडणेकर (प्रगती संकुल, म्हापसा), माधुरी मोरजकर (प्रगती संकुल, म्हापसा), राजेंद्र शेट शिरोडकर (बायणा, वास्को), पुष्पराज कुंभार (नवेवाडे, वास्को) आणि महेश कानोळकर (माऊसवाडा, पेडणे) यांचा समावेश आहे.

Goa POP Ganesh Idols
Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

मिरामार, करझांळेत तरंगत्या मूर्ती

गणेश विसर्जनानंतर मिरामार व करंझाळे किनाऱ्यावर ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) काही गणेशमूर्ती खराब अवस्थेत तसेच पाण्यावर तरंगताना आढळून आल्या. यामुळे समुद्री पर्यावरणाला धोका निर्माण होण्याबरोबरच धार्मिक भावनाही दुखावण्याची शक्यता लक्षात घेऊन गोवा हिंदू युवा शक्तीचे अध्यक्ष सुजन नाईक आणि सद्गुरू युवा फेडरेशनचे अध्यक्ष गुरुप्रसाद बोरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक युवकांनी किनाऱ्यावर विखुरलेल्या गणेशमूर्ती व त्यांचे अवशेष गोळा केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com