

Udhampur Majalta Terrorist Encounter Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील मजालता या डोंगरी भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत भीषण चकमक झाली. या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले. उधमपूरच्या मजालता तहसील मुख्यालयाजवळील रामकोट-बिलावर मार्गावरील खुबन भागात काही कट्टर दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या पक्क्या माहितीच्या आधारे स्थानिक पोलीस, विशेष ऑपरेशन ग्रुप आणि भारतीय सैन्याच्या संयुक्त पथकाने काल रात्री सुमारे 9 वाजता संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम सुरु केली.
सुरक्षा दलांनी शोधमोहीम तीव्र करत दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले असता, घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी (Terrorist) सैनिकांवर अंधाधुंद गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही अत्यंत आक्रमक पवित्र घेत गोळीबारासह रॉकेट लाँचरने हल्ला चढवला आणि संपूर्ण परिसरावर ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने पाळत ठेवली. सुरक्षा दलांच्या या भीषण प्रतिहल्ल्यानंतर दहशतवाद्यांकडून होणारा गोळीबार पूर्णपणे बंद झाला. रात्रभर चाललेल्या या थरारक मोहिमेत दोन दहशतवादी ठार झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
सध्या घटनास्थळी सुरक्षा दलांचे उच्च अधिकारी तळ ठोकून आहेत. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह शोधण्याचे काम अत्यंत वेगाने सुरु असून संपूर्ण मजालता परिसराची नाकेबंदी करण्यात आली. सुरक्षेचा उपाय म्हणून स्थानिकांना घराबाहेर न पडण्याच्या आणि सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, गावातून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची अत्यंत बारीक तपासणी केली जात असून संशयित घरांची झडती घेतली जात आहे.
मागील काही दिवसांपासून उधमपूर आणि लगतच्या डोंगराळ भागात दहशतवाद्यांची हालचाल वाढल्याच्या बातम्या समोर येत होत्या. या घटनेनंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, उधमपूरमधील शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतरच परिसरातील जनजीवन पूर्ववत केले जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सुरक्षा दलांच्या या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी कट उधळला गेला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.