CCTV Dainik Gomantak
गोवा

Panaji CCTV: पणजीत सीसीटीव्ही आहेत; पण सुरक्षा रामभरोसे

पणजी शहरात सीसीटीव्ही सीसीटीव्ही बंद

दैनिक गोमन्तक

राज्यातील सर्व प्रमुख रस्ते सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असतील, असे परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांनी ठामपणे सांगितले असले, तरी पणजीतील 180 कोटी रुपयांच्या (ICCC) प्रकल्पाला जवळपास तीन वर्षे उशीर झाला आहे. तसेच पणजी शहरात यशस्वीरित्या स्मार्ट कॅमेरे बसवले गेले आहेत. मात्र ते नेटवर्कच्या अभावामुळे बंद असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

(cctv cameras all panaji city but bad internet means they dont work )

L&T आणि इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड (IPSCDL) ने संपूर्ण पणजी शहरात यशस्वीरित्या स्मार्ट कॅमेरे स्थापित केले आहेत, परंतु योग्य इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभावामुळे ते बंद असल्याची माहिती समोर आली आहे. यावर उपाय म्हणून “IPSCDL ने गोवा ब्रॉडबँड नेटवर्क (GBBN) आणि आयटी विभागाकडे ते कार्यान्वित करण्यासाठी अधिक बँडविड्थ मागितली आहे. परंतु एक वर्षापासून याला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने हे काम थांबले असल्याचं अधिकाऱ्यांने सांगितलं

गेल्या आठवड्यात, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी घोषणा केली होती की गोव्यात सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलवर पुढील 2-3 महिन्यांत कॅमेरे बसवले जातील. यामुळे नियमभंग सारख्या समस्यांना स्त्रियांना सामोरे जावे लागते. यापुढे असे गुन्हेगार पकडता येतील तसेच या समस्या सोडवता येतील असे ते म्हणाले होते. मात्र कॅमेरे बंद असल्याने यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आयपीएससीडीएलच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हा प्रकल्प 95 टक्के तयार आहे. मात्र या अधिक गती देण्यासाठी GBBN ने आम्‍हाला सहकार्य केल्यास ते तातडीने पुर्ण करता येईल. शक्य तितक्या लवकर सुरू करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत हे काम पुर्ण होऊ शकेल असे ही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT