Sonali Phogat Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat मृत्यू प्रकरणाच्या CBI चौकशीला केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली मान्यता

Sonali Phogat Death Case: सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाची आता सीबीआय चौकशी करणार आहे.

दैनिक गोमन्तक

Sonali Phogat Death Case: सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाची आता सीबीआय चौकशी करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने चौकशीची शिफारस केली आहे. याआधी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीही सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्याचवेळी सोनाली फोगट यांचे कुटुंबीयही सातत्याने सीबीआय चौकशीची मागणी करत होते. रविवारी याच मागणीसाठी हिसारमधील धर्मशाळेत खाप पंचायतही बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये फोगट यांची मुलगी यशोधराही पोहोचली होती.

हरियाणा सरकारने ही मागणी केली होती

सोनाली फोगट प्रकरणाचा तपास गोवा पोलीस करत होते. मात्र, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Haryana Chief Minister Manohar Lal Khattar) यांनी यापूर्वीच या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी असे म्हटले होते. गोवा पोलिसांच्या तपासावर कुटुंबीय समाधानी नसेल, तर हे प्रकरण सीबीआयकडे (CBI) सोपवावे, असे ते म्हणाले होते. गोवा पोलिसांचे (Goa Police) पथक गेल्या अनेक दिवसांपासून गुरुग्राम, नोएडा आणि इतर ठिकाणी जाऊन पुरावे गोळा करण्यात गुंतले होते.

दुसरीकडे, 23 ऑगस्ट रोजी सोनाली फोगट यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांना गोव्यातील अंजुना रुग्णालयात मृतावस्थेत आणण्यात आले होते. या प्रकरणी सोनाली फोगट यांचे पीएम सुधीर सांगवान आणि आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. या दोघांनी सोनाली यांना ड्रग्ज दिल्याची कबुली दिली आहे. सोनाली फोगट यांना दोन वेळा ड्रग्ज दिल्याचे त्यांनी कबूल केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते. नंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या शरीरावर जखमा असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेल्या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT