CBI Dainik Gomantak
गोवा

CBI ला गोव्यात सरकारी कर्मचाऱ्याची चौकशी करण्यासाठी आता घ्यावी लागणार सरकारची मंजुरी, अधिसूचना जारी

Goa Govt: गोव्यात सरकसकट नसली तरी सरकारी कर्मचाऱ्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारची मंजुरी घेणे आवश्यक केले आहे.

Pramod Yadav

गोवा सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून, यापुढे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्याची चौकशी करण्यासाठी सीबीआयला राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाला मोकळीक असणार आहे. पण, त्यासाठी सीबीआयला राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागेल, असे सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

त्यामुळे यापुढे गुन्हे अन्वेशन विभागाला राज्यातील सरकारी कर्मचाऱ्याची चौकशी करण्यापूर्वी सरकार दरबारी परवानगी घेऊन तपास करावा लागणार आहे.

महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार असताना सीबीआयला राज्यात चौकशी करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले होते.

दरम्यान, महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने हा निर्णय मागे घेत सीबीआय तपासाला मोकळीक दिली. सुशांत सिंग राजपूत याचे मृत्यूप्रकरण असेल किंवा त्यावेळी चर्चेत असलेल्या टीआरपी प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारने हा सीबीआयला परवानगी बंधनकारक केली होती.

त्यानंतर आता गोव्यात सरकसकट नसली तरी सरकारी कर्मचाऱ्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारची मंजुरी घेणे आवश्यक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT