Teachers Pending Salary: 458 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा थकीत पगार कधी मिळणार? सरदेसाईंचं मुख्य सचिवांना पत्र; तात्काळ वेतनाची केली मागणी

Diocesan Society Teachers: विजय सरदेसाई यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून डायोसेशन सोसायटीच्या १३८ शाळांतील ४५८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थकीत पगार तात्काळ देण्याची विनंती केली आहे.
Diocesan Society Teachers
Teachers Pending SalaryDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: फातोर्डेचे आमदार तथा गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून डायोसेशन सोसायटीच्या १३८ शाळांतील ४५८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थकीत पगार तात्काळ देण्याची विनंती केली आहे. या शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा थकीत पगाराचा विषय हल्लीच झालेल्या विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला होता.

मुख्यमंत्र्यांनी त्यांचा थकीत पगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अजून त्याबाबत प्रक्रिया सुरू न झाल्याचे आपल्याला कळले आहे, असे सरदेसाई यांनी पत्रात नमूद केले आहे. मंगळवारी मडगावात पत्रकारांशी बोलताना सरदेसाई यांनी सांगितले की, गोव्यातील शिक्षण क्षेत्रात अंधाधुंदी कारभार सुरू आहे. शि शिक्षण क्षेत्रात भाजपने राजकारण आणले आहे, असा आरोप त्यांनी केला.

Diocesan Society Teachers
Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

पूल बांधणे म्हणजे विकास नव्हे !

गोव्यात शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे व पुढील पिढीसाठी ही धोक्याची घंटा आहे, असे सांगून सरदेसाई म्हणाले की, पूल बांधणे म्हणजे विकास नव्हे. पेपरफुटी, वशिलेबाजी, शिक्षितांना नोकरी न मिळणे हे वाईट द्योतक आहे, असेही त्यांनी सांगितले. आरोग्य व शिक्षण क्षेत्र मजबूत असेल, तर राज्याचा विकास होत असतो, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com