गोव्यात दरवर्षी होणाऱ्या सनबर्न संगीत महोत्सवाला यावर्षी देखील तीव्र विरोध होताना दिसत आहे. महोत्सव दक्षिण गोव्यात होणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केल्यानंतर गोमंतकीय चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात (गुजरात) सनबर्न हलविण्यात यावा अशी मागणी केलीय.
वर्षाअखेरीस दरवर्षी उत्तर गोव्यातील वागातोर येथे सनबर्नचे आयोजन केले जाते. यावर्षी मात्र याचे स्थान बदलून ते दक्षिणेत स्थलांतरीत करणार असल्याची घोषणा आयोजकांनी शुक्रवारी केली. या घोषनेनंतर गोव्यातील नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी याप्रकरणी तात्काळ प्रतिक्रिया देत उत्तर गोव्यात ड्रग, गुन्हे यांचे साम्राज्य निर्माण केल्यानंतर भाजप सरकारने आता दक्षिण गोव्यावर वक्रदृष्टी वळवली असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, कसल्याही परिस्थितीत दक्षिण गोव्यात सनबर्न होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेतून दिला.
त्यानंतर आता आणखी काही नेते आणि सामाजिक कार्यकर्ते या महोत्सवाला विरोध करत आहेत.
बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी सनबर्न उत्तर किंवा दक्षिण नव्हे तर गोव्यातूनच त्याला हद्दपार करा अशी मागणी केली.
'ना दक्षिण ना उत्तर आम्हाला सनबर्न गोव्यातच नकोय. आम्हाला ड्रग पेडलर, वेश्या व्यवसाय नकोय. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अगोदर कोलमडली आहे. सनबर्नला रोका, आम्हाला विरोध करतोय', असे बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस म्हणाले.
तर, राधाराव ग्रेसियस यांनी, 'गुजरातमध्ये चांगला विकास झालाय, तिथे सनबर्न हलविण्यात यावा. सनबर्न महोत्सवाला विरोध करणारा ठराव सर्व पंचायतींनी संमत करावा', अशी मागणी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.