Republican Party of India | Ramdas Athawale Dainik Gomantak
गोवा

जातीनिहाय जनगणना, SC-ST समाजाला जमीन; रामदास आठवलेंच्या गोवा सरकारपुढे 9 मागण्या

एससी, एसटी समाजातील लोकांना कसण्यासाठी जमीन देण्यात यावी - रामदास आठवले

Pramod Yadav

Republican Party of India: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मंगळवारी (दि. 10 ऑक्टोबर) गोव्यात पत्रकार परिषद घेतली.

आठवले यांनी यावेळी राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. आठवलेंनी गोव्यात जातीनिहाय जनगणना, SC-ST समाजाला जमीन देण्यासह विविध नऊ मागण्या केल्या आहेत.

काय आहेत मागण्या

1) पर्वरीत सहा डिसेंबर 2023 पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पायाभरणी करावी.

2) देवस्थान समितीच्या जमिनीत समावेश झालेल्या एससी, एसटी समाजातील लोकांना मालकी अधिकार द्या.

3) एससी, एसटी समाजातील लोकांना कसण्यासाठी जमीन देण्यात यावी.

4) गोव्यात जातीनिहाय जनगणना करा.

5) दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील एससी, एसटी समाजाचे आरक्षण 2 वरुन 5 टक्के केले जावे.

6) एससी, एसटी प्रमाणपत्र देण्यासाठी 1968 ऐवजी 1987 हे वर्ष ग्राह्य धरावे

7) गोव्यात एससी, एसटी समाजासाठी स्वतंत्र वित्त विकास महामंडळ स्थापन करण्यात यावी

8) राज्यात एससी समाज कल्याण विभागाची करण्यात यावी

9) वार्षिक अर्थसंकल्पात एससी समाजासाठी स्वतंत्र अर्थिक तरदूत करण्यात यावी.

गोव्यात ST समाजाला आरक्षण अशक्य

गोव्यात एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणावरुन वाद होत असताना राज्यात एसटी आरक्षण अशक्य असल्याचे विधान रामदास आठवले यांनी केले. राज्यात या समाजाची संख्या कमी असल्याने आरक्षण अशक्य असल्याचा दावा मंत्री आठवले यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT