Mhaji Bus Smart Card Dainik Gomantak
गोवा

Mhaji Bus: म्हजी बस प्रवासासाठी 'स्मार्ट' पर्याय! कॅशलेस सुविधा सुरु; प्रवाशांना होणार 10 टक्के बचतीचा लाभ

Mhaji Bus Smart Card: महामंडळाचे महाव्यवस्थापक एम.व्हाय. पेडणेकर यांनी सांगितले की, कॅशलेस सेवा अधिकाधिक प्रवाशांनी स्वीकारावी, यासाठी जागरुकता मोहीम राबविण्यात येत आहे.

Sameer Panditrao

Mhaji Bus Smart Card Updates

पणजी: गोव्यातील कदंब परिवहन महामंडळाने स्मार्ट कार्डची सुविधा लागू केली असून याचा फायदा ‘म्हजी बस’ योजनेअंतर्गत चालणाऱ्या बसेसमध्येदेखील प्रवाशांना घेता येणार आहे.

या योजनेंतर्गत येणाऱ्या बसेस आणि महामंडळाच्या सर्व बसेससाठी ही योजना लागू असून, ग्राहकांना अधिक लाभ मिळावा यासाठी कॅशलेस प्रवासाचा अनुभव देण्याचा हा प्रयत्न आहे. या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि बचतीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. महामंडळ देत असलेले स्मार्ट कार्ड आता ‘म्हजी बस’ योजनेतदेखील वापरता येणार आहे. राज्यातील कुठल्याही मार्गावर हे कार्ड ग्राह्य असून, महिन्याला किमान १० टक्के बचतीचा लाभ प्रवाशांना होतो. या स्मार्ट कार्डमुळे तिकीट खरेदीची प्रक्रिया जलद, सोपी आणि पारदर्शक झाली आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत ७ मार्गांवर कॅशलेस बससेवा राबविण्यात येत आहे. पणजी शहरातील शाळा, महाविद्यालये तसेच जवळील ग्रामपंचायतींमध्ये प्रवाशांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी विशेष अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यासंदर्भात जागृतीपर कार्यक्रम देखील घेण्यात आले आहेत.

दरम्यान, महामंडळाचे महाव्यवस्थापक एम.व्हाय. पेडणेकर यांनी सांगितले की, कॅशलेस सेवा अधिकाधिक प्रवाशांनी स्वीकारावी, यासाठी जागरुकता मोहीम राबविण्यात येत आहे. या सुविधेमुळे फसवणूक आणि तिकीट खरेदीसाठी लागणाऱ्या वेळेचा प्रश्न सुटेल. त्यामुळे प्रत्येकाने स्मार्ट कार्डचा वापर करून कॅशलेस सेवेचा लाभ घ्यावा. कॅशलेस बससेवा आणि स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर, आधुनिक आणि विश्वासार्ह झाला आहे. या उपक्रमामुळे गोवा राज्यातील वाहतूक व्यवस्थेने डिजिटलीकरणाकडे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

‘स्मार्ट कार्ड’ मिळविण्याची प्रक्रिया

स्मार्ट ट्रान्झिट कार्ड कदंब परिवहन महामंडळाच्या पणजी कार्यालयातून मिळते. प्रवाशांना वेळ नसेल तर ऑनलाईन अर्ज करून कार्यालयात नंतर भेट देऊन कार्डाची प्रत घेता येते. कार्डसाठी १५० रुपये शुल्क भरावे लागते. मात्र, ही रक्कम तिकीट शुल्काच्या स्वरूपात कार्डवर जमा केली जाते. कार्डवरील रक्कम संपल्यास ग्राहकांना ऑनलाईन रिचार्ज करण्याची सुविधा दिली आहे.

‘स्मार्ट कार्ड’चा वापर कसा करावा?

स्मार्ट कार्ड वापरण्याची पद्धत सोपी आहे. प्रवाशांना बसमध्ये चढताना आणि उतरताना कार्ड स्कॅन करावे लागते. त्यानंतर प्रवासाच्या अंतरानुसार तिकीट शुल्क आकारले जाते. हे शुल्क कार्डवरून स्वयंचलित पद्धतीने कपात केले जाते.

पास आणि कार्डमध्ये फरक काय?

महामंडळ देत असलेल्या मासिक पासपेक्षा स्मार्ट कार्ड प्रवाशांसाठी अधिक फायदेशीर ठरत आहे. मासिक पाससाठी दर महिन्याला नूतनीकरण करावे लागते, तर स्मार्ट कार्ड एकदा घेतल्यावर दीर्घकाळ वापरता येते. कार्डसाठी कोणतीही अंतिम मुदत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT