Yuri Alemao: 'भाजप सरकार केवळ योजना सुरू करून कार्यक्रम करते'; म्हजी बस, वाहतूक धोरणावर आलेमाव यांचे टीकास्त्र

Mhaji Bus: भाजप सरकारने पुरेशी वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली असती, तर लोकांनी या सेवेला पसंती दिली असती. ‘म्हजी बस’ योजनेत खासगी बसेसचा समावेश करण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याची टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
Yuri Alemao | Mhaji Bus
Yuri Alemao | Mhaji BusDainik Gomantak
Published on
Updated on

Yuri Alemao Alleges CM Pramod Sawant On Mhaji Bus Transport Service

पणजी: भाजप सरकारने पुरेशी वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली असती, तर लोकांनी या सेवेला पसंती दिली असती. ‘म्हजी बस’ योजनेत खासगी बसेसचा समावेश करण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याची टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

दसऱ्यानिमित्त कदंब महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यावर युरी यांनी आक्षेप नोंदविला. राज्यभरातील मार्गांवर धावण्यासाठी पुरेशा सुविधा आणि बसेस नाहीत. सरकार खोट्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगण्यात मग्न आहे. कदंब महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस आणूनही त्यांचा वापर करून महामंडळ नफ्यात आणण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे आलेमाव म्हणाले.

‘म्हजी बस’ योजना सुरू झाल्यानंतर रात्रीच्यावेळी ती बससेवा चालविण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले. भाजप सरकार केवळ योजना सुरू करून कार्यक्रम करते, शुभारंभानंतर त्या बंद पडतात. हीच अवस्था ‘म्हजी बस’ योजनेची झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Yuri Alemao | Mhaji Bus
Yuri Alemao: ..हा तर दुसरीकडे लक्ष वळवण्याचा 'भाजपचा' प्रयत्न! वेलिंगकर प्रकरणावरून आलेमाव यांचे आरोप

‘लोकांचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न’

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे रस्ते अपघातात लोक मृत्युमुखी पडतात. आमचे रस्ते दुचाकी वाहनांसाठी सुरक्षित नाहीत. अजूनही हजारो खड्डे बुजविण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार या मुद्यावर लक्ष केंद्रित करत नाही, तर लोकांना या गंभीर प्रश्नापासून विचलीत करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.

‘रात्रीच्या बससेवेत सरकार अपयशी’

रात्री ९ नंतर लोकांना बससेवा मिळते का? रात्रीच्या वेळी लोक प्रवास कसे करतील? ‘म्हजी बस’ योजना योग्य सेवा देण्यात अपयशी ठरली. भाजप सरकारने नावापुरते असे करू नये, पण नाविन्यपूर्ण कल्पना आणण्यासाठी त्यांनी विधायक पावले उचलली पाहिजेत, जेणेकरून रात्रीच्या वेळी दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या औद्योगिक कामगारांना मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com