Cashews Dainik Gomantak
गोवा

काणकोणात काजू मोहरला मात्र आंबा रूसला!

अद्याप आंब्याला पालवी येऊन मोहरण्याची प्रक्रिया सुरू झाली नसल्याने आंबा पीक लांबणीवर जाण्याबरोबरच घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

काणकोण : काणकोणात (Canacona) काजू (Cashews) मोहरला मात्र आंबा रूसला. काणकोणात काजू डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यत पडलेल्या अवकाळी पावसाची तमा न बाळगता मोहरला आहे मात्र आंबा रूसला आहे. अद्याप आंब्याला पालवी येऊन मोहरण्याची प्रक्रिया सुरू झाली नसल्याने आंबा पीक लांबणीवर जाण्याबरोबरच घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

काणकोणच्या डोंगराळ भागात काजू लागवड मोठ्या प्रमाणात आहे.सद्या 3500 हेक्टर जमिन काजू लागवडीखाली आहे.संपूर्ण राज्यात काजू लागवडीखालील क्षेत्र कमी होत असले तरी काणकोणात काजू लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे.राज्यात 55 हजार हेक्टर जमिन काजू लागवडी खाली आहे.दरवर्षी सरासरी 24 हजार मेट्रिक टन काजू उत्पादन राज्यात होते.सरासरी प्रति हेक्टरी 500 किलो काजू बियांचे उत्पादन होते. काजूला ऑर्गेनीक नामांकन देण्याची मागणी. काणकोण, केपे, सांगे व उर्वरित राज्यातील काजू पूर्णपणे ऑर्गेनिक आहेत. या भागातील काजू बागायतदार काजू उत्पादनासाठी कोणत्याच प्रकारच्या सेंद्रीय खतांचा वापर करीत नाहीत. यंदा काजू व आंब्याचे पीक कमी येण्याची शक्यता.

काणकोण मधील काजू बागायतदाराचे आर्थीक अंदाज पत्रक अवकाळी पडलेल्या पावसामुळे बिघडण्याची शक्यता आहे.अवकाळी पावसामुळे काजू त्याचप्रमाणे आंब्याचा मोहर लांबणीवर पडला आहे. सद्या काही प्रमाणात थंडीचा जोर वाढत आहे त्याचा काही प्रमाणात फायदा काजू पिकाला होणार आहे मात्र यंदा हवामान बदलामुळे नेहमीपेक्षा काजू पीक कमी येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे काणकोणचे विभागीय कृषी अधिकारी किर्तीराज नाईक गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT