Cashew Feni Business in Goa Dainik Gomantak
गोवा

Cashew Feni: पारंपरिक फेणीला आधुनिक साज! निर्मितीला मिळतेय यांत्रिकीकरणाची जोड

Cashew Feni Business in Goa: काजूलाना’ या ब्रँडच्या नावाने अस्सल गावठी तयार फेणीपासून केलेली विविध प्रक्रियायुक्त फेणी उत्पादने आज बाजारपेठेत ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहेत.

Sameer Panditrao

वाळपई: गोवा विधानसभेचे माजी उपसभापती तथा वाळपईचे माजी आमदार व बागायतदार नरहरी हळदणकर व त्यांच्या कुटुंबीयांनी १९८० सालापासून गेली ४५ वर्षे या हुर्राक, काजू फेणी व्यवसायात आपली वेगळी छबी निर्माण केली आहे. ‘

काजूलाना’ या ब्रँडच्या नावाने अस्सल गावठी तयार फेणीपासून केलेली विविध प्रक्रियायुक्त फेणी उत्पादने आज बाजारपेठेत ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहेत. या काजू फेणी उत्पादन प्रक्रियेला आता यांत्रिकीकरणाची जोड लाभली आहे.

वाळपई भाग, वास्को, म्हापसा, पणजी, कळंगुट, मडगाव, फोंडा, डिचोली, साखळी, पेडणे आदी ठिकाणी ‘काजूलाना’ ब्रँड पोहोचलेला आहे. काजूलाना प्युअर काजू फेणी, मसाला काजू फेणी, डिलक्स काजू फेणी, हळदणकर प्रीमियम काजू फेणी, काजूलाना गोल्ड काजू फेणी, सत्तरी कोकोनट फेणी, काजू हुर्राक, काजूलाना इलायची काजू फेणी अशा विविध फेणीपासून बनवलेल्या फेणी उत्पादनांनी यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या काजूलाना फेणीचा चव खूप न्यारी असते. त्यामुळे गोव्यातील कानाकोपऱ्यात काजूलाना ब्रँडने आपले जाळे पसरविले आहे.

दरवर्षी ग्रामीण भागातील फेणी उत्पादन करीत असलेल्या व्यावसायिकांकडून फेणी खरेदी करणे, बोंडू रस घेणे, बोंडू फळे घेणे, स्वत:च्या जागेत बोंडू रस यंत्राने काढणे, हुर्राक करणे अशाप्रकारे साठविलेल्या फेणीपासून विविध फेणी उत्पादने केली जातात.

व्यावसायिकांचा ‘आर्थिक कणा’

काजू बोंडू फळांच्या रसापासून तयार केली जाणारी गावठी फेणी ही बागायतदार व फेणी व्यावसायिकांसाठी ‘आर्थिक कणा’ गणली गेलेली आहे. सत्तरी तालुक्यात गावोगावी काजू फेणी निर्मिती करणारे लहान-मोठे व्यावसायिक आहेत. जे तयार फेणी गोव्यातील इतरत्र व्यावसायिकांना नंतर विक्री करीत असतात.

हळदणकर यांचे सामाजिक कार्यही..!

नरहरी हळदणकर यांनी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सरकारच्या काळात उपसभापती म्हणून विधानसभेत चांगले कामकाज हाताळले होते. तसेच वाळपई मतदारसंघाचे दोनवेळा आमदार म्हणूनही प्रतिनिधित्व करीत वाळपई मतदारसंघात सर्वांगीण विकासकामांना चालना दिली होती.

वाळपई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्थायी समितीचे अनेक वर्षांपासून अध्यक्ष असून वाळपई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही काम करीत आहेत. साहित्य क्षेत्रात मराठी भाषेसाठी हळदणकर योगदान देत आहेत. गोवंश संवर्धनासाठीदेखील ते नेहमीच मदतीद्वारे कार्यरत असतात. आपला व्यवसाय संभाळून सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच हातभार लाभलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT