Goa Cashew News Dainik Gomantak
गोवा

Cashew Season: काजू बागायतदारांना मोठा फटका! काजूबिया खरेदी बंद, असंतुलित हवामानामुळे उत्पादनात घट

Cashew Purchase Goa: यंदाच्या मोसमात पिकलेल्या काजूबियांची खरेदी आता जवळपास बंद झाली आहे. काजू खरेदीसाठी काही व्यावसायिकांनी लावलेले तराजूही काढले आहेत.

Sameer Panditrao

डिचोली: यंदाच्या मोसमात पिकलेल्या काजूबियांची खरेदी आता जवळपास बंद झाली आहे. काजू खरेदीसाठी काही व्यावसायिकांनी लावलेले तराजूही काढले आहेत. नाही म्हटले, तरी कालपर्यंत बागायतदार बाजारासह डिचोलीतील काही व्यापाऱ्यांकडून काजूबियांची खरेदी होत असल्याचे दिसून येत होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने कहर केल्याने काजूबियांच्या खरेदीवर मोठा परिणाम झाल्‍याचे दिसून येत आहे.

व्यापारी पावसात भिजलेल्या काजूबिया खरेदी करण्याचा धोका पत्करत नाहीत. त्यामुळे या व्यापाऱ्यांनी आता काजूबिया खरेदी करणे बंद केले आहे. असंतुलित हवामानामुळे यंदा काजूच्‍या पिकात मोठी घट तर झालीच शिवाय दुसऱ्या बाजूने अपेक्षेप्रमाणे काजूबियांना शेवटपर्यंत दरही समाधानकारक मिळाला नाही.

यंदा काजूबियांचा दर प्रतिकिलो १६३ रुपयांवर गेलाच नाही. कालपर्यंत तर १६१ रुपये किलो असा काजूबियांचा भाव होता. एका बाजूने काजू उत्पादनात झालेली घट आणि दुसऱ्या बाजूने काजूबियांना समाधानकारक दर मिळाला नसल्याने यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे, अशा प्रतिक्रिया काजू बागायतदारांमधून ऐकायला मिळत आहेत.

असंतुलित हवामानामुळे यंदा काजूच्‍या पिकावर मोठा परिणाम झाला आहे. सुरवातीस काजूची झाडे समाधानकारकपणे मोहरली होती. त्यामुळे यंदा उत्‍पादन समाधानकारक मिळेल अशी आशा काजू बागायतदारांमध्ये निर्माण झाली होती. मात्र मध्यंतरी प्रतिकूल हवामानामुळे काजू पिकावर परिणाम होताना, काजू बागायतदारांचे तोंडचे पाणीच पळाले. असंतुलित हवामानामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ५० टक्के घट झाली आहे, असे नार्वे येथील एक काजू बागायतदार तुकाराम गावडे यांनी सांगितले. तसेच यंदा अपेक्षेप्रमाणे बाजारात काजूबिया विक्रीसाठी आल्या नाहीत, असे एक व्यापारी शिरोडकर यांनी सांगितले.

तुकाराम गावडे, काजू बागायतदार (नार्वे)

यंदा काजूबियांचा दर प्रतिकिलो १६३ रुपयांवर गेलाच नाही. कालपर्यंत तर १६१ रुपये किलो असा काजूबियांचा भाव होता. एका बाजूने काजू उत्पादनात झालेली घट आणि दुसऱ्या बाजूने काजूबियांना समाधानकारक दर मिळाला नसल्याने यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT